न्यू इंडिया बँक घोटाळाप्रकरणी मोठी अपडेट; आरोपींच्या तब्बल १६७ कोटींच्या मालमत्तांवर टाच.
महादंडाधिकारी न्यायालयाने २१ मालमत्तांवर टाच आणण्यास परवानगी दिली असून, मुंबईतील हा पहिलाच प्रकार आहे. न्यू इंडिया को-ऑप. बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात आरोपींच्या २१ मालमत्तांवर टाच आणण्याची परवानगी न्यायालयाने दिली…
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे पुणे महापालिकेने मागितला खुलासा.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशांअभावी प्रसूतीवेळी गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. आमदार अमित गोरखे यांनी यानंतर रूग्णालयाच्या प्रशासनावर काही गंभीर आरोपही केले. पुणे महापालिकेने घटनेची दखल घेत रुग्णालयाकडून…
पत्नीला केली जबर मारहाण, पती फरार, छत्रपती संभाजीनगरमध्ये कौटुंबिक कलह टोकाला.
छत्रपती संभाजीनगर येथील बजाजनगरमध्ये पतीने कौटुंबिक वादातून पत्नीच्या गळ्यावर धारदार कात्रीने वार केल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर पतीने घटनास्थळावरून पळ काढलाय. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली…
कर्जाचा विळखा त्यात नैराश्यानं ग्रासलं, ३२ वर्षीय शेतकरी तरुणानं जीवन संपवलं, कुटुंबावर संकट, आता आईचे काय.
मुर्तीजापूर तालुक्यातील शेरवाडी गावातील ३२ वर्षीय युवा शेतकरी विवेक बाबाराव ढाकरे यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. गेल्या महिन्यात जिल्ह्यात सहा तर फक्त मुर्तीजापूर मतदारसंघातच चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने ही परिस्थिती अत्यंत…
एडनच्या आखाताजवळ संशयित नौका, कारवाईत घबाड, २५०० किलो…, ‘आयएनएस तर्कश’ युद्धनौकेची कारवाई.
एडनच्या आखाताजवळ महत्त्वपूर्ण कारवाईत नौदलाच्या ‘आयएनएस तर्कश’ या युद्धनौकेने २५०० किलो अमली पदार्थ जप्त केले. व्यूहरचनात्मक मोहिमेद्वारे ही कारवाई करण्यात आली. त्यात हवाई देखरेखीसह कमांडोंचादेखील सहभाग होता. ही युद्धनौका मुंबईत…
पुण्याच्या ससून रुग्णालायात एसीबीची मोठी कारवाई, १ लाख रुपयांची लाच घेताना दोन अधिकारी रंगेहाथ सापडले.
ससून रुग्णालयाच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे वरिष्ठ सहाय्यक जयंत चौधरी आणि कार्यालय अधीक्षक सुरेश बोनावळे यांना अटक झाली आहे. महाविद्यालयाच्या ३२ वर्षीय फर्निचर पुरवठा करणऱ्या व्यावसायिकाकडे महाविद्यालयातील विविध कामांसाठी लागणाऱ्या…
कचऱ्याचा डब्बा दारात ठेवण्यास नाकारल्याने तरुणाला मारहाण.
पुणे : दारात कचऱ्याचा डबा ठेवण्यावरून तरुणाला दगडाने तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना पाषाण येथे मंगळवारी (१ एप्रिल) रात्री नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रमोद हनुमंत मेघावत (वय २८, रा.…
पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक; दोन पिस्तूल जप्त.
दिघी : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दिघी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया करत दोघांना अटक केली. आरोपींकडून दोन पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले आहे. पहिली कारवाई रविवारी (दि. ३०) सायंकाळी…
घरफोडी करणारा परप्रांतीय चोरटा अटकेत; शहरात ठिकठिकाणी गुन्हे केल्याचे उघडकीस.
पुणे : परराज्यातून दुचाकीवरून येऊन घरफोडी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. वारजे माळवाडी भागात घरफोडी करुन हा चोरटा पसार झाला होता. त्याच्याकडून एका दुचाकीसह कटावणी, कटर, पाना असा ऐवज…
खासगी कार्यालयातून साडेपाच लाखांची रोकड लंपास; लष्कर भागातील घटना.
पुणे : लष्कर भागातील ईस्ट स्ट्रीट परिसरातील एका खासगी कार्यालयातून साडेपाच लाखांची रोकड चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजीव विश्वेश पटेल (वय ६८, न्याती…


















