बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही..

प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या रिक्त पदांचा प्रश्न आ . एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने गरिबांना ‘सिझेरियन’ सारख्या सुविधांसाठी खासगी रुग्णालयात जाऊन हजारो रुपये खर्च करावे लागत असल्याचा संतापजनक प्रकार आमदार एकनाथराव खडसे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहात मांडला. खडसे यांच्या मागणीनंतर अखेर सरकारने या जागा भरण्यासाठी पावले उचलल्याचे स्पष्ट केले आहे.
आमदार एकनाथराव खडसे यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना सांगितले की, बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयात अनेक वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ आणि भूल तज्ज्ञ अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे रुग्णालयात शस्त्रक्रिया व प्रसूती सेवा ठप्प झाल्या आहेत. डिसेंबर २०२५ पासून हा प्रश्न गंभीर झाला असून, सामान्य जनतेला नाइलाजास्तव खासगी डॉक्टरांकडे जाऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. “गोरगरीब जनतेने जायचे कुठे?” असा थेट सवाल खडसे यांनी यावेळी उपस्थित केला.

एकनाथराव खडसे यांच्या प्रश्नावर
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सरकारची बाजू मांडली. त्यांनी कबूल केले की बोदवडमध्ये वैद्यकीय अधीक्षकांसह तज्ज्ञांची कमतरता आहे. खडसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेत मंत्र्यांनी सद्य परिस्थितीती मांडताना सांगितले की सद्यस्थितीत ३ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहेत. तसेच तज्ज्ञांच्या भरतीसाठी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
गट-अ मधील वैद्यकीय अधीक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे. संपूर्ण राज्यात १४४० पदे भरण्यासाठी ४ नोव्हेंबर २०२५ रोजीच जाहिरात काढण्यात आली असून, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

बोदवड ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या जीर्ण इमारतीचा प्रश्नही खडसे यांनी मांडला त्यावर उत्तर देताना सरकारने २०२६-२७ च्या राष्ट्रीय आरोग्य अभियान (PIP) मध्ये नवीन इमारत बांधकाम प्रस्तावित केल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
एकनाथराव खडसे यांच्या या पाठपुराव्यामुळे आता बोदवड ग्रामीण रुग्णालयाला लवकरच पूर्णवेळ तज्ज्ञ डॉक्टर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • Related Posts

    गोलानी आणि बी. जे. मार्केटचा ‘लुक’ बदलणार, पण बंद लिफ्टच्या वनवासातून ज्येष्ठांची सुटका कधी?

    गोलानी आणि बी. जे. मार्केटचा ‘लुक’ बदलणार, पण बंद लिफ्टच्या वनवासातून ज्येष्ठांची सुटका कधी? जळगाव शहराची व्यापारपेठ असलेल्या गोलानी मार्केट आणि नवीन बी. जे. मार्केटचा कायापालट करण्यासाठी महापौर दीपमाला काळे…

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सावित्री शक्ती पीठ, पुणे तर्फे बुरहानपूर जिल्ह्यातील आठ कर्तबगार महिलांचा सन्मान.

    सावित्री शक्ती पीठ, पुणे तर्फे बुरहानपूर जिल्ह्यातील आठ कर्तबगार महिलांचा सन्मान.

    टोल कर्मचाऱ्यांची मुजोरी! पारोळा टोल नाक्यावर महिलांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; १०-१२ जणांवर गुन्हा दाखल.

    टोल कर्मचाऱ्यांची मुजोरी! पारोळा टोल नाक्यावर महिलांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; १०-१२ जणांवर गुन्हा दाखल.

    जळगावात भीषण अपघात: पाचव्या मजल्यावरून कोसळून तरुण मजुराचा मृत्यू; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.

    जळगावात भीषण अपघात: पाचव्या मजल्यावरून कोसळून तरुण मजुराचा मृत्यू; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.

    पिंपरीनांदू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; १७ एप्रिल रोजी निघणार भव्य मिरवणूक.

    पिंपरीनांदू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; १७ एप्रिल रोजी निघणार भव्य मिरवणूक.

    एस.टी. महामंडळ कर्मचारी ग्रुप व समता फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग शाळेत सामाजिक उपक्रम.