एस.टी. महामंडळ कर्मचारी ग्रुप व समता फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग शाळेत सामाजिक उपक्रम.

एस.टी. महामंडळ कर्मचारी ग्रुप व समता फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग शाळेत सामाजिक उपक्रम.

जळगाव : समाजातील वंचित घटकांप्रती संवेदनशीलता जपत इन्स्टिट्यूट फॉर रुरल डेव्हलपमेंट अँड सोशल सर्व्हिसेस, जळगाव संचलित उत्कर्ष मतिमंद विद्यालय, जळगाव येथे एक हृदयस्पर्शी सामाजिक उपक्रम पार पडला. समता फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप करण्यात आले, तसेच एस.टी. महामंडळ कर्मचारी ग्रुप व समता फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेस फ्रीज सप्रेम भेट देण्यात आला.

या प्रसंगी समता फाउंडेशन जळगाव जिल्हा समन्वयक आशा सुनिल तडवी, कोर्स तज्ञ संगिता पाटील व वाहतूक पोलीस सुनिल तडवी यांनी समता फाउंडेशनतर्फे तयार करण्यात आलेले ड्रेस विद्यार्थ्यांना सप्रेम भेट दिले. नव्या ड्रेसमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी निर्माण झाली. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत दिसणारा आनंद आणि समाधानाचा क्षण उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.

कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक संजय बोरसे तसेच विकास तंत्रनिकेतनचे प्राचार्य अनंत महाजन यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आत्मविश्वास, स्वावलंबन व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शाळेला देण्यात आलेला फ्रीज हा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांसाठी उपयुक्त ठरणार असून या उपक्रमामुळे शाळेच्या सुविधांमध्ये भर पडली आहे. या संपूर्ण उपक्रमातून ‘सेवा हीच खरी पूजा’ या भावनेचा प्रत्यय देत समाजातील दिव्यांग विद्यार्थ्यांप्रती आपुलकी व जबाबदारी जपण्याचा संदेश देण्यात आला. समता फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून अशा सामाजिक कार्यांमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या जळगाव शहर अध्यक्षपदी तुषार भुसारे यांची निवड,

    आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या जळगाव शहर अध्यक्षपदी तुषार भुसारे यांची निवड, आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या जळगाव शहर अध्यक्ष पदावर तुषार भुसारे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाचे संस्थापक डॉ.…

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ, रावेर तालुका (प्रतिनिधी) –विनोद कोळी.निंभोरा येथील महर्षी वाल्मिक नगर, कोळीवाडा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रारंभ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एस.टी. महामंडळ कर्मचारी ग्रुप व समता फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग शाळेत सामाजिक उपक्रम.

    एस.टी. महामंडळ कर्मचारी ग्रुप व समता फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग शाळेत सामाजिक उपक्रम.

    गोलानी आणि बी. जे. मार्केटचा ‘लुक’ बदलणार, पण बंद लिफ्टच्या वनवासातून ज्येष्ठांची सुटका कधी?

    गोलानी आणि बी. जे. मार्केटचा ‘लुक’ बदलणार, पण बंद लिफ्टच्या वनवासातून ज्येष्ठांची सुटका कधी?

    आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या जळगाव शहर अध्यक्षपदी तुषार भुसारे यांची निवड,

    आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या जळगाव शहर अध्यक्षपदी तुषार भुसारे यांची निवड,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.