जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

विषेश प्रतिनिधी- शिवानंद पांचाळ नायगांवकर नायगाव बाजार ) दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला अधिक संवेदनशील व समाजाभिमुख दिशा देण्याच्या उद्देशाने नायगाव येथील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ या मूल्याला अधोरेखित करणारी प्रेरणादायी शपथ घेतली. जनसेवा फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गजानन शंकरराव पा चव्हाण यांच्या विनंतीनुसार आयोजित या उपक्रमात आरोग्य विभागाच्या प्रशासनानेही सक्रिय सहभाग नोंदवत समाजाप्रती आपली जबाबदारी अधोरेखित केली.
उपस्थित वैद्यकीय अधीक्षक डॉ अन्नपूर्णा पापुलवार,डॉ लोंढे आर एस, अजयकुमार अल्लमवार, मंजुषा चव्हाण, संतोष जाधव, पठाण सर, प्रवीण आंबोरे, अविनाश कोठाळकर, जावेद सर, या सर्व डॉक्टरसह सिस्टर गोसिया शेख,भाग्यश्री अल्सटवार, अर्चना गुडसुरकर, रेणुका ताई, श्वेता सुखकर, लक्ष्मी शिवलाड, अंबादास पाळेकर, रोहिणी हनुमंते, शिवशंकर मठवाले, गोविंद कदम,माधुरी बलखंडे, विमल गुडमेथी, राजश्री नवघरे, अशोक जवाहर, शाम हंसापुरे, शिवाजी भुताळे, रविचंद्र धुळे, सदाशिव हम्पले, मतीन पठाण, पवळे सिस्टर, सुरेखा मेत्रे, सुधाताई कांबळे, बनबरे मॅडम, विशाल कांबळे, अनिता स्वामी, यावेळी गजानन पाटील चव्हाण मित्रपरिवार तथा नायगाव शहर व तालुक्यातील सामाजिक राजकीय विविध पेशंट सह डॉक्टर, परिचारिका, तांत्रिक कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण समाजाचे देणे लागतो, ही जाणीव मनात ठेवून रुग्णसेवा अधिक प्रामाणिक, तत्पर व संवेदनशील पद्धतीने देण्याचा संकल्प सर्वांनी केला. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना त्वरित व प्रभावी उपचार मिळावेत, यासाठी अधिक जबाबदारीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये सेवा भाव वाढीस लागतो आणि रुग्णांप्रती विश्वास दृढ होतो. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, अशा सकारात्मक उपक्रमांना पुढेही प्रोत्साहन दिले जाणार आहे.
या शपथविधीमुळे रुग्णालयातील वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, समाजसेवेचा आदर्श घालून देणारा हा उपक्रम ठरला आहे. जनतेच्या आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून कार्य केल्यास, आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास अधिक बळकट होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त गजानन पाटील चव्हाण अध्यक्ष जनसेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी व्यक्त केला आहे









