दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन काका गांधी (दादा) यांचे रविवार रोजी सायं. ५.३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पुत्र श्रेयान्स जैन व विनोद जैन, तसेच कुटुंबीय असा मोठा परिवार आहे. ते प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉ. मयूर जैन व जळगावच्या नगरसेविका सौ. शुचिता अतुलसिंग हाडा यांचे मोठे काका होते. मोहन काका गांधी यांनी आपले संपूर्ण आयुष्य जैन धर्मसेवा, मुनीसेवा आणि समाजकार्य यासाठी समर्पित केले. अनेक दिगंबर जैन आचार्य व मुनीमहाराजांच्या सानिध्यात त्यांनी तत्त्वज्ञान, अनेकांतवाद यांचा सखोल अभ्यास केला. विविध ग्रंथांचे त्यांनी अनुवादही केले. त्यांच्या ज्ञान, वक्तृत्व आणि सेवाभावामुळे ते महाराष्ट्रासह देशभर परिचित झाले. प्रख्यात प्रवचनकार मुनीश्री तरुण सागरजी महाराज यांच्यासोबतही त्यांचा विशेष स्नेह होता. मुनीश्रींच्या विहारात अनेक ठिकाणी त्यांनी प्रभावी सूत्रसंचालन करून आपली वेगळी छाप निर्माण केली. त्यामुळे धरणगाव म्हणजे मोहन काका गांधी अशी ओळख समाजात निर्माण झाली होती. त्यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन अनेकांनी समाजसेवा व ट्रस्टचे कार्य पुढे नेले. त्यांच्या कार्याचा ठसा धरणगाव समाजावर कायम राहणार आहे. काकांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन! सोमवार दि. ३० मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघून तापाधडली अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.