पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

रावेर तालुक्यातील पाल वनक्षेत्रातील गारबर्डी परिमंडळातील कक्ष क्रमांक ३२ मध्ये अवैधरित्या डिंक संकलन व वाहतूक सुरू असल्याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर वन विभागाने धडक कारवाई केली. दिनांक २५ मार्च २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत चार आरोपींना ताब्यात घेऊन ११० किलो धावडा डिंक जप्त करण्यात आला.या प्रकरणातील आरोपींमध्ये गणदास गबू डुडवे (वय ३८), अमित सुजान मोरे (वय २१), सावन रणजित मोरे (वय २४) सर्व रा. मेंढागड, जि. खरगोन (मध्यप्रदेश) तसेच हेमराज होरपाल चव्हाण (वय २२, रा. मांडवखेडा, जि. खरगोन) यांचा समावेश आहे.पुढील चौकशीत पाल येथील व्यापाऱ्यांच्या अवैध गोदामांवर धाडी टाकण्यात आल्या. या धाडीत धावडा, सलाई व कड प्रजातीचा एकूण ७,५०० किलो डिंक जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत सुमारे १५ लाख रुपये असल्याचे वन विभागाने सांगितले.
तसेच या कारवाईदरम्यान शाईन कंपनीची गाडी क्रमांक MP10ZA8140 व हिरो होंडा स्प्लेंडर (MH19N-5308) ही वाहने देखील जप्त करण्यात आली.
या प्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ व वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई उपवनसंरक्षक कृष्णा भवर व सहायक वनसंरक्षक सत्यजित निकत यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांच्या पथकाने केली. या कारवाईत वनपाल संभाजी सूर्यवंशी, मोहसीन तडवी, रणधीर काटे, संजय बारेला, जगदीश बारेला, राजमल बारेला, सकीना तडवी, धनाबाई भादले, सविता बारेला, दीपक बारेला, मुकेश तडवी, आकाश बारेला तसेच पोलीस कॉन्स्टेबल जगदीश पाटील व ईश्वर चव्हाण यांनी सहभाग घेतला. या कारवाईस पोलीस निरीक्षक रावेर डॉ. विशाल जयस्वाल यांची विशेष मदत लाभली. वन विभागाच्या या कारवाईमुळे अवैध डिंक संकलन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.

  • Related Posts

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड. प्रतिनिधी | प्रणित काठोके भुसावळ तालुक्यातील फुलगाव शिवार परिसरात असलेल्या हॉटेल वेस्टर्न समोरील ‘दस्तक ड्रॉप इन’ (Dastak…

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.