फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

प्रतिनिधी | प्रणित काठोके भुसावळ तालुक्यातील फुलगाव शिवार परिसरात असलेल्या हॉटेल वेस्टर्न समोरील ‘दस्तक ड्रॉप इन’ (Dastak Drop-In) या इंधन विक्री केंद्राबाबत भुसावळ तहसिल कार्यालयात तक्रार करण्यात आली होती त्या अनुषगांने तहसीलदार, यांच्या आदेशानुसार दि २५ बुधवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शासकीय पथकाद्वारे सदर केंद्राची आकस्मिक तपासणी करण्यात आली.

सदर तपासणी मोहिमेत श्रीमती रोशना रेवतकर (पुरवठा निरीक्षण अधिकारी, भुसावळ) आणि सुरज चव्हाण (सेल ऑफिसर, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड) यांचा समावेश होता. तपासणी दरम्यान केंद्राचे मालक व कंपनी प्रतिनिधी म्हणून नोडे इकबाल अली मोहम्मद (रा. कच्छ) व शेख रियाज शेख मासूम (रा. खडका रोड, भुसावळ) यांच्याकडे विचारणा केली असता, खालीलप्रमाणे गंभीर त्रुटी व नियमबाह्य बाबी आढळून आल्या आहेत .

अधिकृत परवान्याचा अभाव: मालक व प्रतिनिधींकडे आउटलेट चालवण्यासाठी आवश्यक असलेले शासनाचे कोणतेही वैध परवाने किंवा अधिकृत परवानगी पत्रे मागणी करूनही सादर करण्यात आली नाहीत. धोकादायक साठवणूक: इंधन साठवण्यासाठी आवश्यक असलेली सुरक्षा मानके पाळली जात नसल्याचे आणि अत्यंत धोकादायक पद्धतीने ज्वलनशील पदार्थांची साठवणूक केल्याचे दिसून आले. ‘पेट्रोलियम परवाना’ (PESO License) देखील उपलब्ध नव्हता.
वजन व मापे नियमांचे उल्लंघन: केंद्रावरील नोझलची शेवटची तपासणी (कॅलिब्रेशन) सन २०२० मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर त्याचे नूतनीकरण केलेले नाही. वजन व मापे विभागाचे कोणतेही वैध प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही. इंधन गुणवत्ता व लॅब टेस्टिंग: वाहनांना डिझेल म्हणून विकल्या जाणाऱ्या इंधनाचा नेमका प्रकार आणि त्याच्या गुणवत्तेबाबत (Quality) कोणत्याही अधिकृत प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र संबंधितांकडे मिळून आले नाही.

कागदपत्रांची कमतरता: इंधन खरेदी-विक्री आणि ज्वलनशील पदार्थ साठवणुकीबाबतची कोणतीही अधिकृत कागदपत्रे संबंधितांकडे आढळून आली नाहीत. वरील सर्व बाबी सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आणि धोकादायक असल्याने, सदर पंप (Drop-In Center) तात्काळ सील करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.  सदर प्रकरणाचा सविस्तर अहवाल माननीय जिल्हाधिकारी कार्यालय व संबंधित विभागाकडे पुढील कडक कायदेशीर कारवाईसाठी सादर करण्यात आला आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..