५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

प्रतिनिधी | प्रणित काठोके ! जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्काच्या मदतीबाबत आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद सभागृहात सरकारला चांगलेच धारेवर धरले. “जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान होऊनही ५० हजार ७३२ शेतकरी ई-केवायसी अभावी मदतीपासून वंचित का?” असा जळजळीत सवाल खडसे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधानपरिषद सभागृहात उपस्थित केला. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासकीय दिरंगाईचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आमदार खडसे यांनी सभागृहच्या निदर्शनास आणून दिले की, निसर्गाच्या लहरीपणामुळे जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

माहे सप्टेंबर, २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व आपत्ती प्रतिसाद निधीसाठी माहे डिसेंबर, २०२५ च्या पुरवण्या मागण्यांमध्ये १५ हजार ६४८ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आलेली आहे,शासनाकडून मदतीची घोषणा झाली असली, तरी प्रत्यक्ष जमिनीवर मात्र मदत पोहोचलेली नाही. जळगाव जिल्ह्यात ५० हजार ७३२ हून अधिक शेतकऱ्यांची मदत ‘ई-केवायसी’ आणि इतर तांत्रिक त्रुटींच्या नावाखाली प्रलंबित ठेवलेली आहे. शेतकऱ्यांची मंजुर असलेली मदत अडकवून ठेवणे हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. “पंचनामे झाले, नुकसान सिद्ध झाले, मग तांत्रिक बाबींचे कारण पुढे करून शेतकऱ्यांची अडवणूक का केली जात आहे?” असा सवाल एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला.

केवळ जळगावच नव्हे, तर राज्यातील सोलापूर आणि इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यातही अशाच तांत्रिक कारणांमुळे नुकसानभरपाईची रक्कम जमा झालेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शासनाने यावर तातडीने चौकशी करून सतांत्रिक अडचणी दूर कराव्या व सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १००% भरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांना दर्जेदार (सकस) बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही मागणी एकनाथराव खडसे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली
एकनाथराव खडसे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी ही वस्तुस्थिती अंशतः मान्य केली. जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ई-केवायसी प्रक्रियेतील अडथळे दूर करण्यासाठी तालुकास्तरावर विशेष कॅम्पचे (शिबिरांचे) आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मोहिमेद्वारे प्रलंबित तांत्रिक त्रुटी त्वरित दूर करून नुकसानभरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही केली जाईल असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले

जळगावच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकनाथराव खडसे यांनी दाखवलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आता प्रशासनाला वेगाने हलवावे लागणार आहे. “शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत हा पाठपुरावा थांबणार नाही,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यामुळे अनेक दिवसांपासून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या जळगाव जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

  • Related Posts

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% राखीव जागी प्रवेश मिळवण्यासाठी सरकारने लावलेल्या…

    पाणी दूषित प्रकरण गाजले विधान परिषदेत : २६ गावांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; एकनाथराव खडसे यांचा सरकारला जाब, गुलाबराव पाटील यांचे स्पष्टीकरण..

    पाणी दूषित प्रकरण गाजले विधान परिषदेत : २६ गावांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; एकनाथराव खडसे यांचा सरकारला जाब, गुलाबराव पाटील यांचे स्पष्टीकरण.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ; जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    पाणी दूषित प्रकरण गाजले विधान परिषदेत : २६ गावांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; एकनाथराव खडसे यांचा सरकारला जाब, गुलाबराव पाटील यांचे स्पष्टीकरण..

    पाणी दूषित प्रकरण गाजले विधान परिषदेत : २६ गावांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; एकनाथराव खडसे यांचा सरकारला जाब, गुलाबराव पाटील यांचे स्पष्टीकरण..

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    तुकाराम बिजनिमित्त गुणवंतांचा गुणगौरव व महाप्रसाद…

    तुकाराम बिजनिमित्त गुणवंतांचा गुणगौरव व महाप्रसाद…

    पारोळ्यात ‘पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’चा थाटात शुभारंभ; खा. उज्वल निकम यांच्या हस्ते उद्घाटन.

    पारोळ्यात ‘पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’चा थाटात शुभारंभ; खा. उज्वल निकम यांच्या हस्ते उद्घाटन.