पारोळ्यात ‘पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’चा थाटात शुभारंभ; खा. उज्वल निकम यांच्या हस्ते उद्घाटन.

पारोळ्यात ‘पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’चा थाटात शुभारंभ; खा. उज्वल निकम यांच्या हस्ते उद्घाटन.

पारोळा प्रतिनिधी : वाल्मीक पाटील! शहरातील आरोग्य सेवेत मोलाची भर घालत, डॉ. संकेतकुमार खरे व डॉ. सौ. उत्कर्षा खरे यांच्या नूतन पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार तथा विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांच्या हस्ते या नूतन वास्तूची फित कापून लोकार्पण करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.

यात प्रामुख्याने: माजी पालकमंत्री सतीश पाटील नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रतापराव पाटील भाऊसाहेब डॉ. दिनकर पाटील रोहित निकम, छोटू पाटील, भूषण टिपरे यांसह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आणि डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरोग्य सेवेचा नवा अध्याय
उद्घाटनप्रसंगी बोलताना खा. उज्वल निकम यांनी सांगितले की, “ग्रामीण भागात अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. डॉ. खरे दाम्पत्याने या हॉस्पिटलच्या माध्यमातून पारोळाकरांना दर्जेदार उपचार देण्याचा घेतलेला वसा नक्कीच अभिनंदनीय आहे.” माजी पालकमंत्री सतीश पाटील व इतर मान्यवरांनीही हॉस्पिटलच्या अद्ययावत सोयीसुविधांची पाहणी करून शुभेच्छा दिल्या.

अत्याधुनिक सोयींनी सज्ज
डॉ. संकेतकुमार खरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हे हॉस्पिटल केवळ उपचारांचे केंद्र नसून रुग्णांना आपुलकी आणि विश्वास देणारे ठिकाण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे आता गंभीर आजारांच्या उपचारांसाठी रुग्णांना मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज भासणार नाही

  • Related Posts

    सावित्री शक्ती पीठ, पुणे तर्फे बुरहानपूर जिल्ह्यातील आठ कर्तबगार महिलांचा सन्मान.

    सावित्री शक्ती पीठ, पुणे तर्फे बुरहानपूर जिल्ह्यातील आठ कर्तबगार महिलांचा सन्मान, बंभाडा येथील शिक्षिका स्वाती चौधरी यांचाही समावेश; शहापूर येथे सोहळा संपन्न. रावेर (प्रतिनिधी, कमलेश पाटील): राजमाता जिजाऊ आणि ज्ञानज्योती…

    टोल कर्मचाऱ्यांची मुजोरी! पारोळा टोल नाक्यावर महिलांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; १०-१२ जणांवर गुन्हा दाखल.

    टोल कर्मचाऱ्यांची मुजोरी! पारोळा टोल नाक्यावर महिलांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; १०-१२ जणांवर गुन्हा दाखल. जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील टोल नाक्यावर टोल कर्मचाऱ्यांच्या गुंडगिरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किरकोळ वादातून…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सावित्री शक्ती पीठ, पुणे तर्फे बुरहानपूर जिल्ह्यातील आठ कर्तबगार महिलांचा सन्मान.

    सावित्री शक्ती पीठ, पुणे तर्फे बुरहानपूर जिल्ह्यातील आठ कर्तबगार महिलांचा सन्मान.

    टोल कर्मचाऱ्यांची मुजोरी! पारोळा टोल नाक्यावर महिलांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; १०-१२ जणांवर गुन्हा दाखल.

    टोल कर्मचाऱ्यांची मुजोरी! पारोळा टोल नाक्यावर महिलांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; १०-१२ जणांवर गुन्हा दाखल.

    जळगावात भीषण अपघात: पाचव्या मजल्यावरून कोसळून तरुण मजुराचा मृत्यू; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.

    जळगावात भीषण अपघात: पाचव्या मजल्यावरून कोसळून तरुण मजुराचा मृत्यू; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.

    पिंपरीनांदू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; १७ एप्रिल रोजी निघणार भव्य मिरवणूक.

    पिंपरीनांदू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; १७ एप्रिल रोजी निघणार भव्य मिरवणूक.

    एस.टी. महामंडळ कर्मचारी ग्रुप व समता फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग शाळेत सामाजिक उपक्रम.

    एस.टी. महामंडळ कर्मचारी ग्रुप व समता फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग शाळेत सामाजिक उपक्रम.

    गोलानी आणि बी. जे. मार्केटचा ‘लुक’ बदलणार, पण बंद लिफ्टच्या वनवासातून ज्येष्ठांची सुटका कधी?

    गोलानी आणि बी. जे. मार्केटचा ‘लुक’ बदलणार, पण बंद लिफ्टच्या वनवासातून ज्येष्ठांची सुटका कधी?