जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

​जळगाव शहरात बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध जळगाव पोलिसांनी मोहीम तीव्र केली असून, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने एअरपोर्ट परिसरात सापळा रचून दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे आणि स्पोर्ट्स बाईक असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

​पाठलाग करून आरोपींच्या आवळल्या मुसक्या
​मिळालेल्या माहितीनुसार, कुसुंबा आणि एअरपोर्ट रोड परिसरात एक इसम गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने २८ मार्च २०२६ रोजी एअरपोर्टजवळील तारा बिझनेस पार्क परिसरात नाकाबंदी केली.

​यावेळी संशयास्पदरित्या येणाऱ्या एका पल्सर (RS २००) दुचाकीला पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांनी पाहताच या तरुणांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पथकाने अत्यंत शिताफीने पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांची अंगझडती घेतली असता, कमरेला लावलेला एक गावठी कट्टा आणि खिशात ३ जिवंत काडतुसे आढळून आली.

​अटक केलेले आरोपी व मुद्देमाल
​अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दिपक ठकुबा गुंजाळ (वय २८) आणि विठ्ठल रंगनाथ सोनवणे (वय २५) दोन्ही (रा. दुर्गा नगर, सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून २० हजार रुपये किमतीचे पिस्तूल, ३ हजार रुपयांची काडतुसे, १ लाखाची पल्सर बाईक आणि १० हजारांचा मोबाईल असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

​तांबापुरातील संशयित विक्रेता फरार
​पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी कबुली दिली की, त्यांनी हा कट्टा जळगाव शहरातील तांबापुरा भागातील रहिवासी अजय बिरजु गारुंगे याच्याकडून विकत घेतला होता. अजय गारुंगे हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

​दोन दिवसांची पोलीस कोठडी
​आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ॲक्ट आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

​ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, किरण चौधरी, प्रमोद लाडवंजारी, गिरीश पाटील, विशाल कोळी आणि नितीन ठाकूर यांच्या पथकाने केली.

  • Related Posts

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान. जळगाव शहरात प्रथमच दक्षा फाउंडेशन आणि बौद्ध वधू-वर सूचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील बौद्ध समाजासाठी एका…

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर. ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आयोजित ध्येय एज्युकेशन आयकॉन्स समिट २०२५ या राज्यस्तरीय समारंभात बोदवड तालुक्यातील शेलवड जि. प. मराठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.