आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या जळगाव शहर अध्यक्षपदी तुषार भुसारे यांची निवड,

आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या जळगाव शहर अध्यक्ष पदावर तुषार भुसारे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाचे संस्थापक डॉ. कृषीराज टकले पाटील यांनी ११ एप्रिल २०२६ रोजी भुसारे यांना ऑनलाईन नियुक्ती पत्र प्रदान करून त्यांच्यावर संघटनेच्या विस्ताराची मोठी जबाबदारी सोपवली आहे.
तुषार भुसारे यांच्या निवडीमुळे जळगाव शहरात महासंघाचे संघटन अधिक बळकट होईल आणि समाजाचे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास संघटनेच्या वरिष्ठ स्तरावर व्यक्त केला जात आहे.
वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव:
या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल संघटनेच्या महिला आघाडी राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवशंभू प्रिया जांभळे, इतिहास आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सरलष्कर महेंद्र नाईक निंबाळकर, महाराष्ट्र प्रदेश निरीक्षक भानुदास वाबळे पाटील आणि महिला आघाडी प्रदेश समन्वयक शोभनाताई मानकर यांनी भुसारे यांचे अभिनंदन केले.
तसेच इतिहास आघाडी प्रदेश उपाध्यक्ष लखन घाडगे पाटील, प्रदेशाध्यक्ष दीपक पवार, कामगार आघाडी अध्यक्ष उत्तम बिरादर आणि प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. रामकिशन शेळके यांनीही त्यांच्या निवडीचे कौतुक केले. याप्रसंगी खान्देश विभागीय अध्यक्ष नितेश चव्हाण, रुपेश दळवी, अभिजित खैरे यांच्यासह राज्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भुसारे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात या निवडीचे मोठ्या उत्साहात स्वागत होत असून, भुसारे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्याला नवीन गती मिळणार आहे.
54585







