निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

रावेर तालुका (प्रतिनिधी) –विनोद कोळी.निंभोरा येथील महर्षी वाल्मिक नगर, कोळीवाडा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. आद्यकवी महर्षी वाल्मिकी व श्री पांडुरंगाच्या कृपेने, तसेच युगपुरुष सद्गुरू झेंडूची महाराज बेळीकर, खानदेश भूषण वारकरी अलंकार वैकुंठवासी सद्गुरू जगन्नाथ महाराज अंजाळेकर आणि वैकुंठवासी ह.भ.प. गुरुवर्य रूपाजी महाराज निंभोरा यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

ह.भ.प. श्री धनराज महाराज (श्री सद्गुरु जगन्नाथ महाराज संस्थान, अंजाळे) व रामायणाचार्य ह.भ.प. श्री शालिग्राम महाराज चितोडा यांच्या प्रेरणेने या संगीतमय रामायण कथेचा प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राम मंदिर संस्थान, निंभोरा येथून श्रीमद रामायण ग्रंथाची भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. गावकऱ्यांनी ठिकठिकाणी या दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले.

कथास्थळी आगमनानंतर ११ दांपत्यांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न झाली. त्यानंतर सायंकाळी ठीक आठ वाजता संगीतमय रामायण कथेचा शुभारंभ करण्यात आला. या कथेचे वाचन रामायणाचार्य ह.भ.प. श्री शालिग्राम महाराज चितोडा करीत आहेत.

कथेच्या पहिल्या दिवशी महाराजांनी खानदेशातील वारकरी परंपरेवर प्रभावी विवेचन करताना ‘शिवरामायण’ विषयावरही श्रोत्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या भावपूर्ण आणि हृदयस्पर्शी निरूपणामुळे उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. कथेदरम्यान भगवान शंकर व माता पार्वती यांच्या विवाहाचा देखावा सादर करण्यात आला असून, दररोज नव्या सजीव देखाव्यांच्या माध्यमातून कथा अधिक आकर्षक करण्यात येणार आहे.

ही संगीतमय रामायण कथा ३ एप्रिल ते १० एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली असून, दररोज सायंकाळी ७ ते १०.३० या वेळेत कथा होणार आहे. पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

  • Related Posts

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,, खिरोदा, ता. रावेर (दि. ९ एप्रिल २०२६) : धनाजी नाना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, खिरोदा येथे समता फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात…

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार, ​आशिष सपकाळे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड; १३ ते २० एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन ​जळगाव प्रतिनिधी: भारतीय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.