जळगाव बस परिवहन व्यवस्थेतील समस्यांवर ‘अभाविप’ आक्रमक!

जळगाव बस परिवहन व्यवस्थेतील समस्यांवर ‘अभाविप’ आक्रमक!

​महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बससेवेतील विविध समस्या आणि अनियमिततेमुळे जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर जळगाव येथील आगार व्यवस्थापकांना निवेदन देत तीव्र भूमिका घेतली आहे. ​जळगाव शहर हे जिल्ह्याभरातील विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे प्रमुख केंद्रस्थान असल्याने, ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने विद्यार्थी दररोज शैक्षणिक कामांसाठी ‘लालपरी’ने प्रवास करतात. विद्यार्थ्यांसाठी शासनाची बससेवा आर्थिक व सुरक्षित बाबींनुसार फायद्यात्म्क असल्याने ते तिचा वापर करतात.

​परंतु, गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या परिवहनात गंभीर समस्या जाणवत आहेत. यामध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे वेळापत्रकानुसार बस उपलब्ध होत नाहीत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहोचायला उशीर होतो आणि पर्यायाने त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. यावर उपाय म्हणून, बस सर्व ग्रामीण भागातील थांब्यावर वेळेवर उपलब्ध व्हाव्यात अशी ‘अभाविप’ची मागणी आहे.
​याव्यतिरिक्त, बसमधील काही वाहक विद्यार्थ्यांशी गैरवागणूक करत असल्याचे आढळून आले आहे. अशा वाहकांवर योग्य पुरावा मिळताच दंडात्मक कारवाई करण्याची मागणी परिषदेने केली आहे.
​शहरातील शासकीय तंत्रनिकेतन आणि कोर्ट चौक या प्रमुख थांब्यांवर मोठ्या संख्येने विद्यार्थी चढ-उतार करतात. त्यामुळे जळगाव आगारातून यावल-चोपडा आणि धरणगाव-एरंडोल मार्गे जाणाऱ्या बसेस या थांब्यावर थांबल्याच पाहिजेत, अशी स्पष्ट मागणी परिषदेने केली आहे.

​पासधारक विद्यार्थ्यांना पासच्या नूतनीकरणासाठी आगारामध्ये भल्या मोठ्या रांगेत तासन्तास उभे राहावे लागत आहे, ही आणखी एक गंभीर समस्या आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंतीही करण्यात आली आहे. यावेळी अभावीपचे​ महानगर मंत्री चिन्मय महाजन यांनी आगार व्यवस्थापकांना विनंती केली आहे की, या सर्व समस्यांवर त्यांनी लवकरात लवकर उपाययोजना करावी. अन्यथा, विद्यार्थी परिषदेच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागेल.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.