आदिवासी पाड्यावर दीपावलीचा आनंद – अंतर्नाद प्रतिष्ठानचा उपक्रम…

आदिवासी पाड्यावर दीपावलीचा आनंद – अंतर्नाद प्रतिष्ठानचा उपक्रम…

भुसावळ : अंतर्नाद प्रतिष्ठान गेल्या दहा वर्षांपासून दीपावलीच्या निमित्ताने वंचित कुटुंबांपर्यंत आनंद पोहोचवण्याचे कार्य सातत्याने करीत आहे. या वर्षी “वाटीभर फराळ द्या आणि वंचितांचे तोंड गोड करा” या संकल्पनेतून संस्थेने फराळ, नवीन कपडे, शालेय साहित्य व किराणा वाटपाचा कार्यक्रम यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाडा “माथन” येथे आयोजित केला.
हा उपक्रम 20 ऑक्टोबर रोजी आदिवासी लोकांच्या सहभागाने उत्साहात पार पडला. प्रकल्पप्रमुख जीवन महाजन, समन्वयक योगेश इंगळे, प्रसन्ना बोरोले आणि समाधान महाजन यांनी संपूर्ण नियोजनाची जबाबदारी सांभाळली.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्ञानेश्वर घुले, ललित महाजन, अमितकुमार पाटील, कुंदन वायकोळे, राहुल भारंबे, विक्रांत चौधरी, हितेंद्र नेमाडे, अमित चौधरी, देव सरकटे, राजू वारके, चंद्रकांत सूर्यवंशी, शिरीष कोल्हे, कपिल धांडे, केतन महाराज, प्रमोद पाटील, हरीश भट, निवृत्ती पाटील, सचिन पाटील, जीवन सपकाळे आणि मंगेश भावे यांनी परिश्रम घेतले.अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमामुळे माथन पाड्यावर आदिवासी कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंदाचे सोनेरी क्षण अनुभवता आले.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.