रसलपुर गणातून रौनक तडवी यांची उमेदवारी चर्चेत!

रसलपुर गणातून रौनक तडवी यांची उमेदवारी चर्चेत!

रावेर तालुक्यातील उटखेडे येथील तरुण आणि जनसंपर्कात निपुण असलेले रौनक कादर तडवी यांनी आगामी पंचायत समिती निवडणुकीत रसलपुर गणातून उमेदवारी सादर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे.रौनक तडवी यांनी 2023 साली उटखेडे ग्रामपंचायतीवर बिनविरोध सदस्य म्हणून निवड जिंकली होती. त्यानंतर सर्व सदस्यांचा विश्वास संपादन करून त्यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीतील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गावातील विकासकामांवर विशेष भर देत सर्वसामान्य जनतेचा विश्वास जिंकला आहे.राजकीय कार्यासोबतच सामाजिक क्षेत्रातही रौनक तडवी यांचे योगदान उल्लेखनीय आहे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद या संघटनेत त्यांनी उपजिल्हाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि उत्तर महाराष्ट्र महानिरीक्षक या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या सांभाळल्या आहेत. या पदांवरून त्यांनी आदिवासी समाजाच्या न्याय आणि हक्कांसाठी अनेक आंदोलने, निवेदने आणि सामाजिक उपक्रम राबवले आहेत.त्यांच्या या सातत्यपूर्ण सामाजिक कार्यामुळे आणि युवकांना प्रेरणा देणाऱ्या नेतृत्वामुळे रसलपुर गणात युवा नेतृत्वाला संधी देण्यात यावी, अशी मागणी जनतेतून जोरदारपणे पुढे येत आहे.स्थानिक पातळीवर तरुण नेतृत्व, प्रभावी संघटन कौशल्य आणि लोकसंपर्क या गुणांमुळे रौनक तडवी हे पंचायत समिती निवडणुकीत एक बलाढ्य दावेदार म्हणून उदयास येत आहेत.

उच्चशिक्षित तरुण तसेच आदिवासी युवा नेतृत्व -जिल्ह्यात आणि तालुक्यात दांडगा जनसंपर्क असलेला सर्वगुण संपन्न एक युवा चेहरा म्हणजे रौनक कादर तडवी!

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.