सिंधी कॉलनी तरुणांच्या हाती मनसेचा झेंडा;बदलाची हाक! राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास..

सिंधी कॉलनी तरुणांच्या हाती मनसेचा झेंडा;बदलाची हाक.. राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास..

जळगाव : सिंधी कॉलनी परिसरातील उत्साही तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेत पक्षात जंगी प्रवेश केला. बदलाची आस, स्पष्ट नेतृत्व आणि शहरासाठी काम करण्याची प्रेरणा या तीन गोष्टींनी प्रभावित होऊन तरुणांनी मनसेची वाट निवडल्याचे सांगितले जात आहे.

राज ठाकरे यांच्या थेट, निर्भीड आणि युवकाभिमुख भूमिकेमुळे तरुणांमध्ये मनसेबद्दलचे आकर्षण वाढत असल्याचे स्पष्ट चित्र सिंधी कॉलनीत दिसून आले. प्रवेशप्रसंगी तरुणांनी शहरातील वाढत्या समस्या, वाहतूक अनुशासन, स्वच्छता आणि रोजगाराच्या संधी यावर ठोसपणे आवाज उठवणाऱ्या पक्षाच्या भूमिकेचे कौतुक केले.

सिंधी कॉलनीच्या तरुणांनी “बदल हवा तर धाडस हवं, आणि मनसेसोबत उभं राहणं म्हणजे बदलाच्या वाटेला सुरुवात” असा संदेश देत पक्षात सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या तरुणांच्या प्रवेशामुळे जळगावातील युवकांमध्ये मनसेची पकड अधिक मजबूत झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

यांनी केला प्रवेश.. लक्ष सोनवणे. योगा सोनवणे. कमलेश सोनवणे. मनवा धारा. कन्हैया राजपाल. विशाल राजपाल. किरण बागल. सागर नाथ. आकाश जोशी. विष्णू कटारिया. गौरव कटारिया. यश कवन. दीपक राठोड. साहिल ठाकूर. प्रतीक जोशी. यांच्यासह इतर 40 तरुणांनी केला पक्षप्रवेश,

या प्रसंगी मनसेचे मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे. महानगर अध्यक्ष तळेले. उपमहा नगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे. राजेंद्र निकम.ललित शर्मा. शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील. वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष रज्जाक सय्यद. सतीश सैंदाणे. यांच्या मनसैनिक उपस्थित होते.

  • Related Posts

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान. धरणगाव तालुका प्रतिनिधि -‌ राजु बाविस्कर, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद तर्फे तात्यासाहेब ज्योतिबा फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025-…

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू.. प्रतिनिधी | जामठी राज्यातील ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना घरकुल मिळवून देणाऱ्या विविध आवास योजनांची तांत्रिक अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांनी प्रलंबित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..