खासगी कार्यालयातून साडेपाच लाखांची रोकड लंपास; लष्कर भागातील घटना.

पुणे : लष्कर भागातील ईस्ट स्ट्रीट परिसरातील एका खासगी कार्यालयातून साडेपाच लाखांची रोकड चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजीव विश्वेश पटेल (वय ६८, न्याती हायलँडस, महंमदवाडी, हडपसर) यांनी याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी पटेल हे एक व्यावसायिक असून लष्कर भागातील ईस्ट स्ट्रीट परिसरातील एका सोसायटीत त्यांचे कार्यालय आहे. कार्यालयीन कामासाठी त्यांनी साडेपाच लाख रुपयांची रोकड ठेवली होती. कार्यालयातील खिडकीची काच सरकवून चोरट्याने आत प्रवेश केला. त्यानंतर लाकडी कप्पा उचकटून चोरट्याने रोकड घेतली. त्यानंतर तो तिथून पसार झाला.

सोमवारी दुपारी रोकड चोरीला गेल्याचा प्रकार पटेल यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. दरम्यान, चोरट्याला कार्यालयाची माहिती असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त दीपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक घाडगे तपास करत आहेत.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.