पुणे : एनडीए रस्त्यावरील शिवणे येथे किरकोळ अपघातानंतर जबरदस्तीने वाहनाची चावी काढून घेतल्याबाबत तीन जणांविरुद्ध वारजे माळवाडी पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. नुकसान भरपाईपोटी दहा हजारांची मागणी करण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.
यासंदर्भात तुषार भाटे (वय ३२, रा. केंजळे, ता. भोर) यांनी फिर्याद दिली आहे. भाटे टेम्पोवर चालक म्हणून काम करतात. टेम्पो भाठे एनडीए रस्त्यावरील शिवणे येथे एका दुकानाजवळ टेम्पो मागे घेताना त्याची मालवाहू पिकअपला धडक बसली.
त्यात त्या वाहनाचे नुकसान झाले. त्या वेळी तेथील एकाने भाटे यांना मारहाण करून टेम्पोची चावी काढून घेतली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.










