धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

विषेश प्रतिनिधी शिवानंद पांचाळ नायगांवकर नायगांव (बाजार) एज्युकेशन सोसायटी नायगाव संचलित जनता हायस्कुल कनिष्ठ महाविद्यालय नायगाव येथे दरवर्षी साजरा करण्यात येत असलेल्या कै. अमृतराव पाटील चव्हाण वक्तृत्व स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे हे सलग सदतीसावे वर्ष होते. यावर्षी स्पर्धेचा विषय हा पंडित नेहरू चे विचार व आजचा भारत हा होता. स्पर्धेत जिल्ह्यातील सोळा नामवंत शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी प्राचार्य तथा एज्युकेशन सोसायटी चे कोषाध्यक्ष गोविंदराव मेथे होते तर स्पर्धेचे उदघाटक म्हणून सुप्रसिद्ध लेखक व विचारवंत डॉ. विशाल पतंगे हे होते.
व्यासपीठावर संस्थेचे सचिव केशवराव पाटील चव्हाण, संचालक संगमनाथ कवटीकवार, माजी प्राचार्य ह. सं. खंडगावकर, माजी प्राचार्य के. जी. सूर्यवंशी,जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य बाबासाहेब शिंदे,मुख्याध्यापक गंगाधर चव्हाण, उपाप्रचार्य महादेव सोमावार, उपमुख्याध्यापक हणमंत शिंदे, पर्यवेक्षक उत्तम पाटील, बी. आर. शेख ,बसवंत रिठेवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत माने यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. पी. डी. जाधव यांनी मानले.सुरुवातीला कै. अमृतराव चव्हाण आणि सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्रा. ज्ञानेश्वर बैस आणि सौ. संगीता उप्पलवार यांच्या संगीतसंचाने स्वागतगीताणें केले.

कार्यक्रमाचे उदघाटन करताना प्रा. डॉ. विशाल पतंगे यांनी उत्तम वक्ता होण्यासाठी धैर्य हे महत्वाचे असून सोबतच वाचन आवश्यक असून आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घ्यावे असे आवाहन केले. या प्रसंगी स्पर्धेचे परीक्षक पांचाळ व्ही. एस.,प्रा. डॉ. बाळू दुगडूमवार, प्रा. खानपट्टे एम. एम.,मुख्याध्यापक सुभाष अष्टेकर,दत्ता सूर्यवंशी, यांचेसह महाविद्यालयाचे माजी शिक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थीमोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रा. डॉ. राजेंद्र इंगळे आणि गुरुवर्य वसंत माने यांनी केले.

  • Related Posts

    आम्ही..गावकरी, आमचा संकल्प – एक गाव, एक जयंती–ऍड रामरावजी मल्हारे, नांदेड.

    आम्ही..गावकरी, आमचा संकल्प – एक गाव, एक जयंती–ऍड रामरावजी मल्हारे, नांदेड. विषेश प्रतिनिधी शिवानंद पांचाळ नायगांवकर मित्रांनो प्रत्येक गावोगावी विशेषकरून मोठ्या उत्सवाच्या रूपाने साजरे होणारे कार्यक्रम म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर…

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी.. विषेश/प्रतिनिधी शिवानंद पांचाळ नायगांवकर ; नायगाव येथील विश्वकर्मा नगर भागातील श्री विश्वकर्मा मंदिरात ‘प्रभु विश्वकर्मा विराट प्रकट दिन’ अत्यंत भक्तीमय आणि मंगलमयी वातावरणात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.