बिनशेतीसाठी होत असलेल्या वृक्षतोडीचा कादिर खान हाजी जोरावर खान यांचा पत्रकार परिषदेत खुलासा..

बिनशेतीसाठी होत असलेल्या वृक्षतोडीचा कादिर खान हाजी जोरावर खान यांचा पत्रकार परिषदेत खुलासा..

भडगाव (वा): भडगाव शहरातील टोणगाव शिवारात गट क्रमांक ५६१/१ मध्ये सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या प्रकरणाने चांगलाच वाद पेटवला आहे. या संदर्भात भडगाव शहरातील उद्योजक कादिर खान हाजी जोरावर खान यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भूमिकेचा सविस्तर खुलासा केला. ही पत्रकार परिषद आज दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता, भडगाव शहरातील सुंदरबन फार्म येथे आयोजित करण्यात आली होती.

कादिर खान यांनी सांगितले की, “टोणगाव शिवारात गट क्रमांक ५६१/१ या ठिकाणी होत असलेली वृक्षतोड ही अधिकृत परवानगी घेऊनच केली असुन आम्ही भडगाव नगरपरिषद तसेच वन विभागाकडून सर्व आवश्यक त्या परवानग्या घेतल्या आहेत.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “तक्रारदार सलीम सखावत खान यांनी भडगाव तहसीलदार यांना लेखी दिलेल्या तक्रारीमध्ये २०० ते ३०० झाडे तोडल्याचा आरोप केला असला तरी, प्रत्यक्ष ठिकाणी फक्त १४ ते १५ झाडे होती. याचा पंचनामा वनपरिक्षेत्र अधिकारी सरिता पाटील, वनपाल नंदू पाटील, तसेच नगरपरिषद मुख्याधिकारी व त्यांच्या पथकाने प्रत्यक्ष स्थळी उपस्थित राहून झाडांची पाहणी व पंचनामा केला आहे. तसेच लाकूड वाहतुकीसाठी वाहतूक परवाना देखील आम्ही संबंधित कार्यालयाकडून घेतला आहे.” असा दावा कादिर खान हाजी जोरावर खान यांनी केला.

या प्रकरणात तक्रारदाराने कोणतीही योग्य चौकशी न करता, मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने भडगाव तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला असुन या पत्रकार परिषदेत हाजी जाकीर कुरेशी आणि बब्बू सेठ उपस्थित होते. “अश्या खोट्या व दिशाभूल करणाऱ्या तक्रारी करणाऱ्यांवर प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्यात यावी असे कादिर खान यांनी सांगितले.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.