६१ नग गॅस सिलेंडर चोरीचा गुन्हा एमआयडीसी पोस्टे कडून उघड, चोरी करणारे आरोपी गुन्ह्यात वापरलेल्या आयशर वाहनासह जेरबंद.

६१ नग गॅस सिलेंडर चोरीचा गुन्हा एमआयडीसी पोस्टे कडून उघड, चोरी करणारे आरोपी गुन्ह्यात वापरलेल्या आयशर वाहनासह जेरबंद.

जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील फिर्यादी यांनी भारत पेट्रोलिअम जळगाव येथुन रिफीलींग करुन ३४२ नग सिलेंडर ट्रक वाहनामध्ये भरुन दि.१४/११/२०२५ रोजी रात्री सदर भागात पार्किंग केले होते. दि.१५/११/२०२५ रोजी सकाळी फिर्यादी हे सदरचे सिलेंडर भरलेले वाहन घेवुन जाणेकामी आले असता जागेवर वाहन दिसले नसल्याने आजुबाजुला शोध हे सदरचे वाहन रस्त्याच्या कडेला उभे दिसले व सदरच्या वाहनामधील ३४२ सिलेंडर पैकी ६१ नग सिलेंडरची चोरी झाल्याचे खात्री झाल्याने एमाआयडीसी पोलीस स्टेशन गुरन ८४८/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुप्त बातमिदारांकडून गोपनिय बातमी काढून सदर गुन्हा करणा-या आरोपीतांची ओळख पटवुन सदर आरोपीतांची माहिती काढून सदर गुन्हा करणारे आरोपीतास जळगाव शहरातील एमआयडीसी भागात सापळा रचुन शिताफीने दि. १८/११/२०२५ रोजी ताब्यात घेवुन विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांने त्यांचे नाव शेख फिरोज शेख याकुब, रा नशिराबाद जळगाव असे सांगुन त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवुन त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार नामे सैय्यद मुश्ताक सैय्यद अशपाक रा उस्मानिया पार्क, जळगाव याचेसोबत मिळुन केला असले बाबत सांगितले. सदर गुन्हात चोरी केलेला एकुण १,२२,०००/-रु किमतीचा ६१ नग गॅस सिलेंडर हंड्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेले सुमारे ५,००,०००/- रु किमतीचे आयशर वाहन देखील जप्त करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव चे पोनि बबन आव्हाड यांनी आवश्यक सुचना देवुन एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, पोह गणेश शिरसाळे, पोह प्रदीप चौधरी, पोह गिरीश पाटील, पोह प्रमोद लाडवंजारी, पोह किरण चौधरी, पोकॉ नितीन ठाकुर, पोकॉ किरण पाटील, पोकॉ शशिकांत मराठे, अशांनी केली आहे.

सदरची कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक जळगाव, नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव भाग, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.