सैनिक जागी होते, त्यांच्या बळावरच आम्हाला समाधानतेची झोप मिळाली. शिवराज पाटील होटाळकर..

सैनिक जागी होते, त्यांच्या बळावरच आम्हाला समाधानतेची झोप मिळाली. शिवराज पाटील होटाळकर.. शेळगाव छत्रीचे भूमिपुत्र भारतीय जवान देविदास वाघमारे च्या सेवापूर्ती सोहळ्यात गावकऱ्यांचा भव्य सन्मान…

विशेष प्रतिनिधी : शिवानंद पांचाळ नायगांवकर सैनिकाच्या वर्दीमध्ये एवढी ताकद आहे की शत्रूचा थरकाप उडतो आपल्या जीवाची पर्वा न करता निधड्या छातीने भारतीय जवान सीमेवर लढतात देश आणि देश बांधव सुरक्षित असावेत म्हणून सैनिक भारतवासीयासाठी जागी राहतात त्यांच्या बळावरच आम्हाला समाधानतेची झोप मिळते अशी प्रखड मत माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी आर्मी देविदास चांदोबा वाघमारे यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात व्यक्त केले.

नायगाव तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री येथील भूमिपुत्र भारतीय जवान देविदास चांदोबा वाघमारे यांनी सलग १७ वर्षे आपली देश व बजावून सेवानिवृत्ती घेतले असताना स्व. शंकरराव पांचाळ गुरुजी प्रतिष्ठान व समस्त गावकऱ्यांच्या वतीने भव्य स्वागताचे आयोजन शिक्षक मारोती सालेगाये व त्यांच्या मित्र परिवाराकडून करण्यात आले होते या सेवापूर्ती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पुंडलिक पा.आणेराये तर प्रमुख मान्यवर जि.प.चे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर,कुंटूर चे माजी सरपंच रुपेश देशमुख, नायगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संजय पा. चव्हाण, काँग्रेस पक्षाचे युवा तालुकाध्यक्ष माणिक पा.चव्हाण,संघरत्न ढवळे,इंजी.धीरज सोनकांबळे, संजय सूर्यवंशी,अभिजीत मंगरूळे व सत्कारमूर्ती देविदास वाघमारे यांच्या सौभाग्यवती आई वडील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर प्रस्ताविक मध्ये मल्लिकार्जुन मठपती यांनी या सोहळ्याची पार्श्वभूमी मांडली. साहित्यिक व्यंकटराव आणेराये, पत्रकार माधव बैलकवाड सैनिकाच्या महान कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला. रुपेश देशमुख यांनी आपले विचार मांडताना म्हणाले की, देश सैनिकांच्या सेवापुर्ती मध्ये सहभागी होण्यासाठी भाग्य लागते ते भाग्य आज मला मिळाले आहे आपल्या सेवानिवृत्तीनंतर आता गावातील तरुणांना तुम्ही योग्य मार्गदर्शन करावे आपल्याकडून उत्कृष्ट खेळाडू तयार व्हावेत ही अपेक्षा आहे असेही ते म्हणाले. समस्त गावकऱ्यांच्या सत्काराला उत्तर देताना आर्मी देविदास वाघमारे म्हणाले माझ्या सेवानिवृत्तीनंतर माझा एवढा मोठा सन्मान आपल्याकडून होईल अशी मला वाटलेच नाही पण हा सोहळा पाहून मी अक्षरशः भारावून गेलो आहे असे बोलताना त्यांच्या डोळ्यात आनंदी अश्रू तरळले. यावेळी संजय पा.चोंडे संजय पा.आणेराये, मारुती पाटील शहापुरे, संजय माली पाटील, चेअरमन माधव शहापुरे, व्हाईस चेअरमन माधवराव सालेगाये,स्व. शंकरराव पांचाळ गुरुजी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व गावातील महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती संचलन व आभार मारुती सालेगाये मल्लिकार्जुन मठपती यांनी मानले.

आर्मी देविदास वाघमारे यांची मोटार गाडीतून तहसील कार्यापासून ते नायगाव शहरातून शेळगाव छत्री पर्यंत फुलांची उधळण करीत फटाक्याची आतिषबाजी ढोल ताशाच्या गजरात देशभक्तीच्या गाण्यावर भव्य अशी रॅली काढण्यात आली यावेळी असंख्य जणांनी त्यांचे जागोजागी सन्मान केले, कित्येक महिलांनी औक्षण देखील केले आहे. आर्मी देविदास वाघमारे यांनी आपल्या जन्मभूमीतील बुद्ध विहारास तथागत गौतम बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व दहा हजाराची रोख अशी भेट या सेवापूर्ती निमित्त दिली.

  • Related Posts

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान. धरणगाव तालुका प्रतिनिधि -‌ राजु बाविस्कर, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद तर्फे तात्यासाहेब ज्योतिबा फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025-…

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू.. प्रतिनिधी | जामठी राज्यातील ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना घरकुल मिळवून देणाऱ्या विविध आवास योजनांची तांत्रिक अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांनी प्रलंबित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..