गिरणा धानोरा हद्दीत जप्त केलेल्या तब्बल 55 वाळू च्या ठिय्यांवर आढळली 2585 ब्रास अवैध वाळु साठा ; तहसीलदारांसह सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रशासनाला दिला अहवाल..

गिरणा धानोरा हद्दीत जप्त केलेल्या तब्बल 55 वाळू च्या ठिय्यांवर आढळली 2585 ब्रास अवैध वाळु साठा; तहसीलदारांसह सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रशासनाला दिला अहवाल..

एरंडोल : धानोरा नजीकच्या गिरणा नदीच्या काठावर अवैध वाळू उपसा केलेल्या वाळूचा, तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतंत्रपणे पंचनामा करुन तहसीलदारांच्या अहवालानुसार 55 ठिकाणी वाळु ठियांवर, तब्बल 2585 ब्रास अवैध वाळू साठा तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार 2328 ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला आहे, त्यानुसार जिल्हा प्रशासनाने वाळु साठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्थिर पथक व बैठक पथक नियुक्त केले, असून एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळु साठा उचलून जिल्हा महसूल विभागाच्या आवारात नेण्यास खर्चिक व अडचणीचा ठरणार असल्याने, या अवैध वाळूचा लिलाव जप्त केलेल्या ठिकाणीच केला जाणार आहे. लिलाव करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आहे.

याप्रकरणी एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळु साठा महसूल कर्मचारी नियुक्त असतानाही, अवैध वाळू साठा आढळल्याने प्रांत अधिकाऱ्यांनी धानोरा पोलीस पाटील तर जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळाधिकाऱ्यांसह, तलाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे, धानोऱ्याला कोतवाल नसल्याने कारवाई टळली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागाने लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे, त्यासाठी निविदा काढली जाणार आहे, किमान पंधरा दिवस ही प्रक्रिया चालणार आहे, त्यामुळे वाळु साठा असलेल्या गिरणा काठावर स्थिर पथक व बैठक पथक कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे, तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर धानोरा हद्दीत गिरणा काठावर एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणावर पहिल्यांदाच वाळु साठा जप्त करण्यात आला आहे, त्यामुळे वाळु माफीयांनी अवैध उपसा केलेल्या वाळु साठ्यावर डोळा असल्याने, पोलिसांवरही जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे, तसेच 2585 वाळूब्रास वाळु उचलण्याची खर्चिक व अडचणीची ठरत असल्याने, तसेच सर्व वाळुसाठा जळगाव आणल्यानंतर पुरेशी जागा उपलब्ध होणार नसल्याने महसूल प्रशासनाने, 55 वाळु ठिय्यांचा नदी काठावर त्याच ठिकाणी असलेल्या वाळुठियांचा लिलाव करण्याचा निर्णय, महसूल प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.