“शासकीय कर्मचाऱ्यांचा कुत्रे सांभाळण्यासाठी वापर. शासकीय अधिकाऱ्याचा अधिकाराचा गैरवापर”

“शासकीय कर्मचाऱ्यांचा कुत्रे सांभाळण्यासाठी वापर. शासकीय अधिकाऱ्याचा अधिकाराचा गैरवापर”

जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. जिल्हा परिषदेच्या एका मुख्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाळलेल्या दोन कुत्रे सांभाळण्याची जबाबदारी शासकीय कर्मचाऱ्याना देण्यात आली आहे, त्यामुळे हे शासकीय कर्मचारी आहे, की खाजगी कर्मचारी आहे, हे कळायला मार्ग नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून उपविभागातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे यंत्रणेचे दोन कर्मचारी पाणीपुरवठ्याची कामे न देता, त्यांना अधिकाऱ्यांच्या घरी कुत्रे सांभाळायला नियुक्ती करण्यात आलेली आहे की काय, असे चित्र बघायला मिळाले. तथाकथितरित्या जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाचे काम न करता पाळलेल्या दोन कुत्र्यांची सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आलेली आहे. या दोघ पाणीपुरवठ्याच्या कर्मचाऱ्यांना तथाकथित रित्याने दररोज सकाळी सात वाजेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत, तसेच संध्याकाळी पाच वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत या जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कुत्रे सांभाळण्याचे काम करीत असल्याचे निदर्शनास आले असून याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे.

सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्था, गावांचा विकास, आणि ग्रामीण जनतेची मूलभूत गरज यासाठी नेमलेले हे कर्मचारी, अशा वैयक्तिक कामात गुंतलेले असणे म्हणजे शासकीय सेवेचा आणि लोकविश्वासाचा सरळ अपमान होय. ही बाब केवळ अनुचित नाही, तर महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस (आचारसंहिता) नियम, १९७९ आणि सेवा शिस्त नियमांनुसार दंडनीय अपराध ठरतो.

‘प्रशासन पारदर्शकतेने काम करावे’ असा संदेश देणाऱ्या यंत्रणेतूनच असा सत्तेचा दुरुपयोग होत असेल, तर मग सामान्य कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याची अपेक्षा कशी ठेवायची? हे एक संवेदनाहीन प्रशासनाचे उदाहरण ठरते. लोकसेवकांनी पदाचा उपयोग जनतेसाठी करावा, वैयक्तिक कामासाठी नव्हे,  ही मूलभूत संकल्पना विसरल्याने शासनयंत्रणेबद्दलचा विश्वास ढासळतो. जिल्हा परिषदेमधील प्रमुख अधिकारीच जर अशा प्रकारे कर्मचाऱ्यांचा वापर करत असतील, तर ही बाब केवळ निंदनीय नाही, तर चौकशीयोग्य आणि कारवाईयोग्य आहे. या घटनेवर जिल्हाधिकारी तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी तात्काळ चौकशी करून कारवाई करणे हीच लोकसेवेप्रती खरी जबाबदारी ठरेल. कारण “शासनाची सेवा ही जनतेसाठी आहे, कुत्र्यांसाठी नाही.” सदरील कर्मचाऱ्यांना काही पत्रकारांनी विचारपूस केले असता, त्यांनी ह्या गोष्टीला होकार देऊन, मान खाली टाकून अधिकाऱ्यांच्या निवासस्थानात निघून गेले.

काही पत्रकारांनी याबाबत zp पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राहुल जाधव यांना याबाबत विचारपूस केले असता, त्यांनी सांगितलं की, चौकशी करून तुम्हाला माहिती देतो, असे सांगितले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार पी. गुप्ता यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल कनरवाल यांना विचारपूस करण्यास त्यांचे मोबाईलवर कॉल केले अस्तनांना त्यांनी फोन उचलला नाही. या घटनेवर जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकारी याबाबत चौकशी करतील का यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.