कै.नारायणराव मेटकर वाचनालयात प्रज्ञासुर्याना अभिवादन..

कै.नारायणराव मेटकर वाचनालयात प्रज्ञासुर्याना अभिवादन..

विषेश /प्रतिनिधी (शिवानंद पांचाळ नायगांवकर) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नायगाव तालुक्यातील मौजे मरवाळी येथील कै.नारायणरावजी मेटकर सार्वजनिक वाचनात सदर वाचनालयाचे सचिव रा.ना. मेटकर यांच्या अध्यक्षतेखाली विनम्र अभिवादन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अथांग कार्य या देशासाठी असताना त्यांनी या देशासाठी भारतीय संविधान निर्मिती करून त्यातून खरी लोकशाही व स्वतंत्र्याची सर्वसामान्य माणसासह सर्वांना ओळख करून दिली असल्याने या महान प्रज्ञासूर्याचे सहा डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले.या निमित्ताने त्यांना देशभरात अभिवादन करण्यात आले असून मरवाळी येथील प्रसिद्ध असलेले कै .नारायणरावजी मेटकर सार्वजनिक वाचनालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करून संविधानाचे वाचन करण्यात आले.यावेळी ग्रंथालयच्या अध्यक्षा सौ.आशा मेटकर,ग्रंथालयाचे सचिव श्री रा. ना. मेटकर,जेष्ठ महिला श्रीमती चंदरबाई विठ्ठलराव मेटकर, कर्मचारी संजय आनंदा मेटकर, बाल वाचक प्रथमेश, ऋषिकेश, गंगाधर आदी जण उपस्थित होते.

  • Related Posts

    आम्ही..गावकरी, आमचा संकल्प – एक गाव, एक जयंती–ऍड रामरावजी मल्हारे, नांदेड.

    आम्ही..गावकरी, आमचा संकल्प – एक गाव, एक जयंती–ऍड रामरावजी मल्हारे, नांदेड. विषेश प्रतिनिधी शिवानंद पांचाळ नायगांवकर मित्रांनो प्रत्येक गावोगावी विशेषकरून मोठ्या उत्सवाच्या रूपाने साजरे होणारे कार्यक्रम म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर…

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी.. विषेश/प्रतिनिधी शिवानंद पांचाळ नायगांवकर ; नायगाव येथील विश्वकर्मा नगर भागातील श्री विश्वकर्मा मंदिरात ‘प्रभु विश्वकर्मा विराट प्रकट दिन’ अत्यंत भक्तीमय आणि मंगलमयी वातावरणात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.