
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशांअभावी प्रसूतीवेळी गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. आमदार अमित गोरखे यांनी यानंतर रूग्णालयाच्या प्रशासनावर काही गंभीर आरोपही केले. पुणे महापालिकेने घटनेची दखल घेत रुग्णालयाकडून स्पष्टीकरण मागवले आहे.पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील धक्कादायक प्रकार हा पुढे आला. ज्यानंतर मोठी खळबळ निर्माण झालीये. भाजपचे विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या गर्भवती पत्नीचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. पैशांसाठी भिसे कुटुंबियांची रुग्णालय प्रशासनाने अडवणूक केली. मंत्रालयातून फोन जाऊनही कोणत्याही प्रकारची दाद रुग्णालयाकडून देण्यात आली नाहीये. शेवटी तनिषा भिसे यांचा जीव गेला. आमदार अमित गोरखे यांनी स्वत: याबद्दल खुलासा केला.तनिषा भिसे यांना जुळी मुले असल्याने त्यांची प्रसूती मुदतेच्या अगोदरच करावी लागणार होती. तनिषा प्रसुतीवेदनेने विव्हळत होत्या, मात्र, डॉक्टरांना त्यांच्यावर दया आली नाही.
वीस लाख रूपये लागतील, अगोदर दहा लाख भरा मगच उपचार होईल, अशी भूमिका दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाकडून घेण्यात आली. शेवटी तनिषाला आपले प्राण सोडण्याची वेळ आली. लग्नाच्या आठ वर्षांनी तनिषा या बाळाला जन्म देत होत्या. त्यांना दोन जुळी बाळ झाली.यासर्व प्रकारानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनावर जोरदार टीका केली जातंय. आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. मृत्यू प्रकरणी पुणे महापालिकेने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला खुलासा मागितला आहे. पैशांअभावी रुग्णालयात उपचार दिल्या नसल्याने दोन मुलांना जन्म दिलेल्या आईला जीव गमावला लागला आहे. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
या प्रकरणी पुणे महापालिका आरोग्य प्रमुख निना बोराडे यांनी घटनेची दखल घेऊन रुग्णालयाकडे संपूर्ण माहिती मागवली आहे. याबाबत प्राथमिक चौकशी दिनानाथ रुग्णालयाने सादर केली आहे. सुषमा अंधारे, चित्रा वाघ यांनी देखील या घटनेनंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून हे स्पष्ट करण्यात आले की, या घटनेचा संपूर्ण अहवाल हा आम्ही सरकारकडे पाठू. मात्र, अनेकांनी टीका केलीये.
Video Player
00:00
00:00