जंगलात गेला, इन्स्टाग्रामवर लाइव्ह व्हिडिओ अन् अल्पवयीन कबड्डीपटूने आयुष्य संपवलं, दोन दिवसांनी…

बिलासपूरमध्ये एका अल्पवयीन कबड्डी खेळाडूने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा खेळाडू जंगलात गेला आणि तिथे त्याने गळफास घेतला.एका कबड्डीपटूने इन्स्टाग्रामवर लाइव्ह करत आपल्या आयुष्याची अखेर केल्याची भयानक घटना घडली आहे. छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात ही घटना घडली आहे. कुम्हारी येथील रहिवासी असलेल्या अल्पवयीन कबड्डीपटूने इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत असताना गळफास लावून घेतला. जंगलात ही घटना घडल्याची माहिती आहे. या कबड्डीपटूने बिलासपूरच्या जंगलात गळफास घेतल्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर लाइव्ह केला, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांना ही बातमी मिळाली. यामुळे त्याच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे.हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस विभागातही एकच खळबळ उडाली आहे.

त्याने आपली जीवनयात्रा संपवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बिलासपूर जिल्ह्यातील सोरवा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तासनतास जंगलात या अल्पवयीन कबड्डीपटूच्या मृतदेहाचा शोध घेतला. पोलिसांना तो त्याच्या शेवटच्या लोकेशनपासून 10 किलोमीटरच्या परिसरात सापडला. पोलिसांनी बऱ्याच प्रयत्नांनंतर या अल्पवयीन कबड्डीपटूचा मृतदेह जंगलातून बाहेर काढला.याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बिलासपूरच्या जंगलात तासनतास या अल्पवयीन कबड्डीपटूचा शोध सुरू होता. त्याने हा टोकाचा निर्णय का घेतला याचं कारण अद्याप समजू शकलेले नाही.

तीन दिवसांपूर्वी कुम्हारी अंतर्गत जंजगिरी येथील अल्पवयीन कबड्डीपटू बिलासपूर येथे गेल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर 17 एप्रिल रोजी जंगलात गळफास घेतल्याचा लाइव्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता, जे पाहून कुटुंबीयांनी तात्काळ कुम्हारी पोलीस ठाणे गाठले आणि माहिती दिल्यानंतर पोलीस बिलासपूरला रवाना झाले.कुम्हारी पोलिसांनी याप्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, मुलाने बिलासपूरच्या जंगलात ज्या मुलाने गळफास लावून आपल्या आयुष्याची अखेर केली, त्याची ओळख पटली आहे. १७ वर्षीय कबड्डीपटू जंजगिरी येथील रहिवासी होता. कबड्डी खेळायला जातो असे सांगून तो घरून निघून गेला. या घटनेने मुलाच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.