चार मित्र लग्नाला गेले, परतताना मात्र पोहण्याचा मोह आवरेना; निरा कालव्यात उतरताच तरुणाला काळाने घेरले.

पुण्यातून मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. हडपसर-भेकराईनगर येथील चार मित्र फलटण येथे लग्न समारंभासाठी गेले असता एकावर काळाचा घाला पडला आहे. पुण्यातून मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. हडपसर-भेकराईनगर येथील चार मित्र फलटण येथे लग्न समारंभासाठी आले होते. तेथून घऱी परत जाताना बारामती तालुक्यातील निंबुतजवळील निरा डावा कालव्यात पोहण्यासाठी उतरले असता, त्यापैकी एका २१ वर्षीय तरुणाचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.हडपसर येथील भेकराईनगरमधील तुषार पोपट खेडकर (वय २१), गौरव गजानन भोसले, मंगेश कैलास शेळके आणि सूरज रामदास चौगुले हे मित्र दोन मोटारसायकलवरून फलटणला लग्नासाठी गेले होते.

लग्न आटोपल्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता पुण्याकडे परतत असताना सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास निंबुत छपरी येथील निरा डावा कालव्यात पोहण्यासाठी सर्व मित्र पाण्यात उतरले.पोहताना तुषार खेडकरचा पाय घसरला आणि तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. स्थानिकांच्या मदतीने त्याला पाण्याबाहेर काढले आणि वाघळवाडी येथील साई सेवा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.या घटनेची निखिल रमेश कुन्हाडे (रा. भेकराईनगर, हडपसर) याने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, पुढील तपास सुरू केला आहे.नांदेडातून देखील अशी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.

लग्न सोहळ्यात मंडप उभारण्याचं काम करताना दोन सख्ख्या चुलत भावांना वीजेचा जोरदार धक्का बसला आहे. यामध्ये दोघांचाही दुर्दैवी अंत झाला आहे. हदगांव तालुक्यातील बोरगाव हस्तारा वस्तीत शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेने लग्नसोहळ्यात शोककळा पसरली आहे. मृत भावांचा मंडप आणि डेकोरेशनचा व्यवसाय आहे. रविवारी गावात लग्नसमारंभ असल्याने त्यांना मंडपाचे काम मिळाले होते. पांडुरंग भट्टेवाड आणि साईनाथ भट्टेवाड या दोघे मंडप उभारत होते. इतक्यात सोसाट्याचा वारा आला आणि मंडप हवेत उचलला गेला. त्यामुळे मंडपाला विद्युत तारेचा स्पर्श झाला आणि दोघांनाही वीजेचा जोरदार धक्का बसला, ज्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.