ट्रॅक्टर चालक थेट घरात घुसला अन् अल्पवयीन मुलीसोबत केले वाईट कृत्य.

बारामती तालुक्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. ट्रॅक्टर चालकाने घरात घुसून अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.बारामती तालुक्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. मूर्टी परिसरात एका ट्रॅक्टर चालकाने घरात घुसून अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Minor Girl Assault) केल्याची घटना घडली. या घटनेने बारामती तालुक्याचा पश्चिम भाग हादरला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्यासह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला.रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मूर्टी परिसरात ही संतापजनक घटना घडली. अण्णा किसन गोफणे (रा. मोराळवाडी ता. बारामती) असे या नराधमाचे नाव आहे. दुपारच्या वेळी ट्रॅक्टर चालक असलेला गोफणे पीडित मुलीच्या घरात घुसला आणि तिच्यावर पाशवी अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेच्या आईने पोलिसांत धाव घेतली आणि नराधमाविरोधात तक्रार दाखल केली. वडगाव निंबाळकर पोलिसांनी अण्णा किसन गोफणे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करत आहेत.याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी अण्णा गोफणे याच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम ६५ (२), ३३२ (अ), बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४ (२), ६, अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ३(१) नुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेने बारामती तालुक्याचा पश्चिम भाग हादरला आहे. तर मुलांच्या पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.दरम्यान, नांदेड मधूनही अशीच एक घृणास्पद घटना समोर आली होती. ‘तू मला खूप आवडतेस, आय लव यू, माझ्या सोबत चल,’ असं म्हणत आश्रम शाळेतील एका ४० वर्षीय अधीक्षकाने शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केला. जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातून ही घटना घडली होती.

कुंडलवाडी शहरातील दौलापूर रस्त्यावर संत गोरोबा प्राथमिक आश्रमशाळेत अधिक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या गजानन राजूरवाड याने सातवीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग केला. ‘तू मला खूप आवडतेस, आय लव यू, माझ्या सोबत चल’ असे म्हणत ९ एप्रिल आणि ११ एप्रिलला शाळेच्या परिसरात आणि आश्रम शाळेतील रूमध्ये तिला नेले होते. आणि तिचा विनयभंग केला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते करीत आहेत. विद्यार्थीनींसोबत घडणाऱ्या या घटनांमुळे मात्र पालक चिंताग्रस्त झाले आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.