दोन शून्य एकत्र केले तरी बेरीज शून्यच; संजय निरुपम यांची ठाकरे बंधूंच्या मनोमिलन चर्चेवर सडकून टीका.

राजकीयदृष्ट्या संपलेल्या दोन्ही पक्षांचा स्वार्थ साधण्यासाठी हा प्रयत्न आहे, अशी जोरदार टीका शिवसेनेचे उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी रविवारी केली. ‘महाराष्ट्रहिताच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेना उबाठा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांना महाराष्ट्रातील लोकांनी नाकारले आहे. उबाठा गट आणि मनसे दोन्ही पक्ष कमकुवत झाले आहेत. त्यामुळे दोन शून्ये एकत्र केली तरी बेरीज शून्यच होते.व्यावसायिक भाषेत बोलायचे झाल्यास तोट्यातील दोन कंपन्या एकत्र आल्या तरी त्यातून नफ्यातील कंपनी निर्माण होत नाही. राजकीयदृष्ट्या संपलेल्या दोन्ही पक्षांचा स्वार्थ साधण्यासाठी हा प्रयत्न आहे,’ अशी जोरदार टीका शिवसेनेचे उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी रविवारी केली.

निरुपम पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांचा त्याग केला आणि सत्तेसाठी, कुटुंबासाठी हिंदुत्वाशी गद्दारी केली आणि काँग्रेससोबत गेले. त्यामुळे त्यांचा जनाधार कमी झाला. ते आता स्वत:च्या पायावर उभे राहू शकत नाहीत. त्यामुळेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे दोन शून्ये एकत्र केली तरी बेरीज शून्यच होते, असे ते म्हणाले.उद्धव आणि राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या रक्ताचे वारस असले तरी त्यांच्या विचारांचे खरे वारस एकनाथ शिंदेच आहेत, असेही निरुपम म्हणाले.

‘राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यात महाराष्ट्राच्या हिताचा काय संबंध आहे, या दोघांनाही महाराष्ट्राने नाकारल्याने त्यांना एकत्र येण्याची गरज वाटत असेल,’ अशी तिखट प्रतिक्रिया भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी रविवारी दिली. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, ‘ते जाऊ द्या, कामाचे बोला’, असे सांगत यावर भाष्य करण्याचे टाळले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.