मुंबई २६/११ हल्ल्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात; भाजपचे माधव भांडारींचा खळबळजनक दावा.

‘मुंबईवर झालेल्या हल्ल्यात (२६/११) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता, असे खळबळजनक वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी रविवारी केले.‘मुंबईवर झालेल्या हल्ल्यात (२६/११) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता. स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय एवढा मोठा हल्ला घडू शकत नाही. मुंबईवर हल्ला होणार याची सगळ्यांना कल्पना होती,’ असे खळबळजनक वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी रविवारी केले. ‘दाभोलकर, पानसरे, लंकेश आणि कलबुर्गी या हत्यासाखळीद्वारे हिंदुत्ववादी संघटना मोडीत काढण्याचे षड् यंत्र आहे,’ असा आरोपही त्यांनी केला.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दोष सुटलेले विक्रम भावे यांच्या ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन भांडारी यांच्या हस्ते झाले.

त्या वेळी ते बोलत होते. सनातन संस्थेचे अभय वर्तक, ॲड. संजीव पुनाळेकर आणि भावे उपस्थित होते. ‘सत्ता बदलली तरी पोलिस व्यवस्था बदललेली नाही. दाभोलकर हत्या प्रकरणात शिक्षा झालेले शरद कळसकर आणि सचिन अंदुरे निर्दोष आहेत. त्यांची सुटका होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. आमच्या कामाचा बारामतीच्या काकांना राग होता.फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र यापुढे पवारांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जाणार का? दाभोलकर हत्या प्रकरणाने हिंदुत्ववादी संघटनेचे कंबरडे मोडण्याचे काम केले,’ अशी टीका पुनाळेकर यांनी केली. ‘हिंदू दहशतवाद नाव देऊन विक्रम भावे यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आले.

महाराष्ट्र अंनिसवर प्रशासक नेमून ती नक्षलवादी संघटना म्हणून जाहीर करा,’ अशी टीका वर्तक यांनी केली.‘गुजरात दंगलीपासून हिंदुत्वाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. देशात राजकीय बदल झाला तरी केवळ तेवढ्याने भागत नाही. सरकार आपले असले तरी व्यवस्था आपली नाही. पोलिस, महसूल, न्यायव्यववस्था अशा सर्व क्षेत्रांत वेगळे लोक आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले म्हणजे आपण यशस्वी झालो, असे नाही. व्यवस्था बदलण्याचे मोठे आव्हान आहे,’ असे माधव भांडारी यांनी सांगितले

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.