शेतकऱ्यांना कर्जमाफी हवीच; सातबारा कोरा करण्याचा राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा.

अस्मानी-सुल्तानी संकटांनी शेतकरी जेरीस आला असताना शासनाची धोरणे ही शेतकऱ्यांसाठी घातक असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.’शेतकऱ्यांचा करण्याचे सातबारा कोरा निवडणुकांपूर्वी आश्वासन सरकारने दिले होते. हे आश्वासन आता कुठल्याही स्थितीत सरकारने पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे. राज्य डबघाईला जात असल्याची वस्तुस्थिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठाऊक होती तरीही ही घोषणा करताना त्यांनी महायुतीला याबाबत सावध का केले नाही, असा सवाल उपस्थित करीत सत्ताधारी जातील तेथे आम्ही त्यांची वाट अडवू,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिला.शासकीय विश्रामगृह येथे रविवारी (दि.२०) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. अस्मानी-सुल्तानी संकटांनी शेतकरी जेरीस आला असताना शासनाची धोरणे ही शेतकऱ्यांसाठी घातक असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.

‘जिल्ह्यातील नेत्यांमुळे बँक डबघाईस’ ‘पश्चिम महाराष्ट्रातील बड्या नेत्यांच्या साखर कारखान्यांना तब्बल २ हजार रुपयांची हमी दिली जाते, पण लाखो शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंक वाचविण्यासाठी रुपयाही दिला जात नाही, ही विषमता नाही तर काय आहे? ही बॅंक जिल्ह्यातील नेत्यांनीच डबघाईस आणली. केवळ कुणी ५ लाख रुपयांची ठेव बँकेत ठेवून ही बॅंक वाचणार आहे का?’ असे विचारत त्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली. शेट्टी म्हणाले की, ‘कर्जदार शेतकऱ्यांची वसुली केली जाते तेव्हा त्यांची संपत्ती लिलावात निघते. आम्हालाही जिल्हा बँकेसाठी वसुलीचे अधिकार द्या, कृषिमंत्र्यांची संपत्तीही आम्ही लिलावात काढतो की नाही ते बघा.’कांदा उत्पादकांचा प्रश्न गंभीर आहे. कांद्याचे निर्यातशुल्क हटविण्याचे शहाणपण सरकारला उशिराने सुचले.

योग्यवेळी कांदा निर्यातशुल्क रद्द न केल्याने कांद्याच्या भावात घसरण झाली. ही जबाबदारी सरकारचीच आहे. कांदाप्रश्नी आम्ही मंत्रालयात कांद नेऊन आंदोलन केले होते. तुरुंगात गेलो पण सरकारला उशिराने शहाणपण सुचले. सरकारने कांद्याला १५०० रुपये हमीभाव द्यावा. आमचा नाफेडवर भरवसा नाही, असेही ते म्हणाले. परभणी जिल्ह्यात दीड लाख रुपयांच्या कर्जामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागली. त्याचरात्री त्या शेतकऱ्याच्या गरोदर पत्नीने आत्महत्या केली. तरीही सरकार शेतकऱ्यांसाठी काहीही करू शकत नाही. ही परिस्थिती मन विषण्ण करणारी आहे, असे ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावर कोट्यवधी खर्च .सुनील तटकरे यांच्या घरी एक वाटी आमरस अन् एक मोदक खाण्यासाठी तब्बल दीड कोटी खर्च.कोट्यवधी रुपये खर्च करणारे शेतकऱ्यांसाठी एक रुपयाही देत नाही. सरकारला याची लाजही वाटायला हवी

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.