वरळी सी फेसवर गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, काचेचा तुकडा पाठीत खुपसल्यामुळे महिला गंभीर जखमी, परिसरात खळबळ.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अनिता पाटकर या दुपारी १:३० च्या सुमारास वरळीच्या सी-फेस परिसरातील जेके कपूर चौकातून चालत असताना त्यांची छत्री चुकून आरोपीला लागली. संतापलेल्या आरोपीने त्यांच्यावर मागून धारदार काचेच्या तुकड्याने हल्ला केला, ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. घटनेनंतर महिलेला तातडीने उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.मुंबईच्या वरळी सी-फेस परिसरात एका गर्दुल्ल्याने एका महिलेच्या पाठीत तुटलेल्या काचेचा तुकडा खुपसून तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना काल(२० एप्रिल) दुपारी घडली. ही घटना वरळी सी-फेस येथील जेके कपूर चौकाजवळ घडली. आरोपीला  ने वरळीतील प्रेम नगर येथून अटक केली आहे. आणि त्याला वरळी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आरोपीचे नाव सचिन भगवान अवसरमोल (३५) असे असून, तो मूळचा चिकलठाणा, संभाजीनगर येथील रहिवासी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अनिता पाटकर या दुपारी १:३० च्या सुमारास वरळीच्या सी-फेस परिसरातील जेके कपूर चौकातून चालत असताना त्यांची छत्री चुकून आरोपीला लागली.संतापलेल्या आरोपीने त्यांच्यावर मागून धारदार काचेच्या तुकड्याने हल्ला केला, ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. घटनेनंतर महिलेला तातडीने उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडितेचा मुलगा संदीप बाळू पाटकर (२०) याने काल संध्याकाळी घटनेची तक्रार दाखल केली. त्यानंतर वरळी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिते (BNS) च्या कलम ११८(२) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली.या गंभीर गुन्ह्याची दखल घेत, वरळी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी तात्काळ डीसीपी दत्तात्रय कांबळे (झोन ३) आणि एसीपी दत्तात्रय नाले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला.

क्राइम युनिट ३ आणि वरळी पोलिस डिटेक्शन टीमने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला.सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे, पथकांनी आरोपीचा वरळीतील प्रेम नगर येथे शोध घेतला आणि गुन्ह्यात वापरलेला धारदार काचेचा तुकडा देखील जप्त केला. तक्रारीच्या पाच तासांत पोलिसांनी आरोपी सचिन भगवान अवसरमोलला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने हल्ल्याची कबुली दिल्याचे वरळी पोलिसांनी सांगितले. तुर्तास त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.