नियती! धावत्या रेल्वेवर दगड मारला अन् ५ वर्षांच्या आरोहीने जीव गमावला, आई-वडिलांचा आक्रोश पहावेना.

सोलापुरात एका अज्ञाताने रेल्वेवर दगड फिरकावला. हा दगड एका पाच वर्षांच्या चिमुकलीच्या डोक्यात लागला आणि तिने आपला जीव गमावला. या घटनेने सोलापुरात एकच खळबळ माजली आहे.कर्नाटकातून सोलापूरकडे येणाऱ्या धावत्या पॅसेंजर ट्रेनवर दगड मारल्याने प्रवास करत असलेल्या एका चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाला आहे. सोलापूर शहरातील टिकेकरवाडी येथे हा दुर्दैवी प्रकार घडल्याची माहिती आहे. विजयपूर ते रायचूर दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर एक्सप्रेसमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती आहे. प्रवास करत असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.एका अनोळखी व्यक्तीने बाहेरून दगड मारल्याने गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. रेल्वे पोलीस याबाबत कसून तपास करत आहेत.

आरोही अजित कांगले (वय 5 वर्षे) असं मृत झालेल्या चिमुरडीचे नाव आहेआरोही अजित कांगले ही चिमुकली आपल्या कुटुंबासोबत रेल्वेने प्रवास करत होती. पॅसेंजर गाडी सरू असताना अज्ञात व्यक्तीने दगड फेकला. तेव्हा आरोही ही खिडकीजवळ बसली होती. हा दगड थेट आरोहीच्या डोक्यावर येऊन लागला. दगडाचा जोर एवढा होता की आरोही गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहू लागले. हे पाहून तिचे आई-वडील खूप घाबरले. जखमी अवस्थेतील आरोहीला सोलापूर रेल्वे स्थानक आल्याबरोबर तात्काळ सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, तोपर्यंत खूप उशिर झालेला होता. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तिला तपासलं. डॉक्टरांनी तपासून आरोहीला मृत घोषित केले. लेकीचा मृत्यू झाल्याचं ऐकून कुटुंबाने एकच टाहो फोडला. या दुर्दैवी घटनेमुळे तिच्या कुटुंबियांसह संपूर्ण परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.टिकेकरवाडी हे छोटे रेल्वे स्थानक सोलापूर शहरालगत आहे. कर्नाटकातून आलेली ट्रेन या टिकेकरवाडी स्थानकावरून निघताच अनोळखी व्यक्तीने दगड फेकला. खिडकीत बसलेल्या आरोहीला जोरात मार लागला आणि त्यातच आरोहीचा मृत्यू झाला. परंतु धावत्या रेल्वेवर अशा प्रकारे दगडफेक करणे अतिशय गंभीर बाब आहे. रेल्वे पोलीस याबाबत कसून तपास करत आहेत

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.