आई-वडील कामावर, घरात असं काय घडलं, की….तेरा वर्षाच्या भावाने सात वर्षाच्या लहान बहिणीला संपवलं; कारण हैराण करणारं.

नालासोपाऱ्यात अल्पवयीन भावाने बहिणीला संपवलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.तेरा वर्षाच्या भावाने आपल्याच सात वर्षाच्या लहान बहिणीची गळ्यावर वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नालासोपारा येथे घडली आहे. खेळण्यावरून झालेल्या वादातून तेरा वर्षाच्या भावाने सात वर्षाच्या बहिणीची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. हत्या करणाऱ्या विधीसंघर्षित बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मिथुन शर्मा हे त्यांची पत्नी, तेरा वर्षाचा मुलगा आणि सात वर्षाची मुलगी अंजली असे कुटुंब नालासोपारा पूर्व परिसरात असलेल्या संतोष भुवन येथे पांडुरंग चाळ येथे वास्तव्यास आहे. गुरुवारी शर्मा दांपत्य नेहमीप्रमाणे कामावर गेले असताना त्यांचा मोठा मुलगा खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. तो खेळून घरी परतल्यानंतर त्याची लहान बहीण स्वयंपाक घरातील स्टूलवर खाली पडल्याचे त्याने त्यांच्या शेजाऱ्यांना सांगितले. त्यानंतर याबाबतची माहिती तिच्या आई- वडिलांना देण्यात आली आणि तातडीने अंजलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले,

मात्र डॉक्टरांनी तेथे तिला मृत घोषित केले.स्वयंपाक घरात स्टूलवरून बहीण खाली पडून जखमी झाली असे तेरा वर्षाच्या भावाने सांगितले, त्याप्रमाणे मृत मुलीच्या वडिलांनी पेल्हार पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.मृत अंजलीच्या गळ्याला उजव्या बाजूस जखम असल्याचे डॉक्टरांनी केलेल्या तपासणी दरम्यान निदर्शनास आले. त्यामुळे मृत अंजलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अंजलीचा मृत्यू संशयास्पद पेल्हार पोलीस आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला. मृत अंजलीचा शवविच्छेदन अहवाल शनिवारी प्राप्त झाल्यानंतर अंजलीचा मृत्यू हा गळ्यावर वार केल्याने झाल्याचे समोर आले. त्यानंतर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तेरा वर्षाच्या तिच्या भावाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.

आपणच सात वर्षाची बहीण अंजलीची कटरने वार करून हत्या केल्याचे तेरा वर्षाच्या भावाने कबूल केले. सात वर्षाच्या बहिणीची हत्या करणारा अल्पवयीन मुलगा तेरा वर्षाचा असला तो अनेक वेळा नापास झाला असून उनाड आहे. आई – वडील दररोज कामावर जात असल्यामुळे दोघेही अल्पवयीन भाऊ, बहीण घरात एकटे असत. सात वर्षाच्या अंजलीने मोठ्या भावाला उन्हात खेळायला जाऊ नको असे सांगितले. त्यातून या दोघा भाऊ- बहिणीमध्ये भांडण झाले, त्याच्या रागातून तेरा वर्षाच्या भावाने आपल्या सात वर्षाच्या बहिणीची हत्या केली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.