चिमुकला साचलेल्या पाण्यात पडला, वीजेचा शॉक लागून होत्याचं नव्हतं झालं असतं; तेवढ्यात तरुण देवासारखा धावला अन्… Video पाहून सर्वच थक्क.

एका तरुणाने चिमुकल्यासोबत केलेल्या कृतीने साऱ्यांचीच मनं जिंकली आहेत. तरुणाने आपला जीव धोक्यात घालून एका लहान मुलाला जीवदान दिलं आहे.सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ चर्चेत येतात. असाच एक व्हिडिओ समोर आला असून यात एका तरुणाने केलेल्या कृत्याने त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. एका २४ वर्षीय तरुणाने एका लहान मुलाचा जीव वाचवल्याने त्याला अनेकजण हिरो म्हणत त्याने केलेल्या कृत्याने भारावून गेले आहेत.२४ वर्षीय कन्नन तमिलसेल्वन हा तरुण त्याच्या दुचाकीवरुन जात होता. अचानक त्याला एक शाळकरी मुलगा पावसाच्या साचलेल्या पाण्यात अचानक कोसळताना दिसतो. तरुणाने लगेच आपली दुचाकी थांबवून, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ९ वर्षीय मुलाला वाचवलं.१६ एप्रिल रोजी ही घटना घडली. जेडेन रायन नावाचा एक ९ वर्षीय मुलगा भररस्त्यात साचलेल्या पाण्यात पडला. भूमिगत विजेच्या तारा तिथे पडलेल्या होत्या, त्यामुळे साचलेल्या पाण्यातून चाललेल्या ९ वर्षीय मुलाला विजेचा धक्का बसला.

पाण्यातच विजेचा शॉक बसल्याने जेडेन बेशुद्ध होऊन खाली पाण्यात पडला. त्याचवेळी तिथून कन्नन तमिलसेल्वन हा तरुण आपल्या दुचाकीवरुन जात होता. त्याने मुलगा अचानक पाण्यात पडल्याचं पाहिलं.त्याने लगेच आपली दुचाकी थांबवून मुलाला वाचवण्यासाठी तो ओरडू लागला. विजेचा धक्का लागलेल्या मुलाला तो थेट हात लावू शकत नव्हता. त्यामुळे त्याने जवळच असलेल्या एका घरातून दांडी, लाकडासारखं काही आणण्यास सांगितलं. त्याननंतर तो ती काठी मुलाजवळ नेतो. त्यानंतर आपल्या हाताने मुलाचा हात पकडून त्याला पाण्यातून खेचत काही सेकंदात बाहेर काढतो. त्याला पाण्यातून सुक्या ठिकाणी ठेवतो आणि त्याला सीपीआर देतो.

त्या मुलाला श्वास येतो आणि त्यानंतर तात्काळ त्याला रुग्णालयात नेलं जातं.२४ वर्षीय कन्नन हा डिप्लोमा इंजिनिअर आहे. तो एका कंपनीत कन्स्ट्रक्शन मटेरिअल सप्लायरसाठी काम करतो. त्याने सांगितलं, तो कामावर जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळी मुलगा पाण्यात पडलेला दिसला. म्हणून दुचाकी थांबवली. आधी तो बेशुद्ध पडल्याचं वाटलं, पण नंतर जवळून पाहिलं तर मुलगा थरथरत होता. त्यावेळी मुलाला शॉक लागल्याचं लक्षात आल्याचं तो म्हणाला. मुलाला वाचवण्यासाठी धोका पत्करायचं ठरवलं आणि मुलाचा जीव वाचवता आला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.