देवदर्शनाला जात असताना भाविकाचा रस्त्यातच मृत्यू.

भडगाव : वृंदावन, मथुरा यात्रेसाठी निघालेल्या भाविकाचा रस्त्यातच मृत्यू झाला. या घटनेमुळे गुढे येथील बाविस्कर कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.भडगाव तालुक्यतील गुढे येथील मूळ रहिवासी आणि बोईसर येथे आरती ड्रग्स बोईसर तारापूर MIDC येथे सिनियर कर्मचारी म्हणून वास्तव्यास असलेले ह.भ.प. प्रवीण रूपचंद बाविस्कर (वय ५०) हे बोईसर येथून एका खाजगी यात्रा कंपनीच्या माध्यमातून वृंदावन, मथुरा येथे आठ दिवसांच्या यात्रेकरिता गेले होते. तसेच त्यांना किर्तन, भजनाची आवड व वारकरी संप्रदायामुळे समाजसेवा करण्याची देखील आवड होती.

त्यांच्यासह एकूण ६० भाविक निघाले होते. या प्रवासात त्यांच्यासोबत पत्नी व मुलगा देखील होते. बोईसर ते मनमाड हा प्रवास भाविकांनी खाजगी बसने केला. तेथून मनमाड ते वृंदावन जाण्याची व्यवस्था यात्रा कंपनीने रेल्वेने केली होती. मनमाड येथून रेल्वेमध्ये बसल्यानंतर बाविस्कर यांना छातीत त्रास जाणवू लागल्यावर त्यांना चाळीसगाव स्टेशनवर थांबवून रेल्वे पोलिस मुजम्मिर रहिमान शेख यांनी चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. चाळीसगाव येथे शवविच्छेदन करून बुधवारी त्यांच्यावर मूळ गावी गुढे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.पश्चात पत्नी, मुलगा, तीन भाऊ, पुतणे असा परिवार आहे. ते गुढे येथील धिरज बाविस्कर यांचे काका होत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.