हेडली का पळून गेला किंवा इतर सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यावेळेस असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने दिली पाहिजेत” असं माधव भांडारी म्हणाले.मुंबईवर झालेल्या हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात होता. स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय एवढा मोठा हल्ला घडू शकत नाही, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी रविवारी केल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र आता भांडारींनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.”काल मी जे भाषण केलं त्याचा वेगळा अर्थ घेतला गेला. जे मी बोललो नाही ते तोंडामध्ये घातले आहे. अनेक वृत्तपत्र आणि मीडियाने पण असं काही करण्यात अर्थ नव्हता. पण 26/11 हल्ला माहिती होता की नाही त्यावेळच्या सरकारला.










