जळगाव पोलीस पुन्हा चर्चेत : थेट एमडी ड्रग्ज गुन्ह्यातील संशयिताशी मोबाईल संवाद !

जळगाव पोलीस दल नेहमीच काहीना काही कारणाने चर्चेत येत असतांना आता एक खळबळजनक प्रकरणामुळे पुन्हा एकदा जळगाव पोलिसांची मान खाली गेली आहे. जळगाव पोलिस दलातील स्थानिक गुन्हा शाखा या महत्त्वाच्या विभागात कार्यरत दोन कर्मचाऱ्यांबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यांना एलसीबीतून काढून शहराबाहेरील दोन पोलिस ठाण्यात बदली केली. तर पीएसआय पोटेंचा एमडी ड्रग्ज गुन्ह्यातील अरबाजशी ३५२ वेळा मोबाइलवर संवाद झाल्याचे समोर आले आहे.

गजानन देशमुख व संदीपाल जाधव अशी बदली करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांची पाचोरा व फत्तेपूर या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना प्राप्त झालेल्या तक्रारी व क्लिपच्या आधारे दोघांची गुरुवारी चौकशी करून त्यांची बदली करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. एलसीबीत कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्याबाबत त्यांचे शहरातील एमडी ड्रग्ज विक्रेत्यांसोबत संबंध असल्याबाबत तक्रारीची चौकशी करण्यात आली.

पीएसआय पोटे यांचे शहरातील एमडी ड्रग्ज साठा प्रकरणात फरार असलेला व दुबईला पळून गेलेल्या अरबाज या संशयितासोबत ३५२ वेळा फोनवर संवाद झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. गुरुवारी याबाबत पोलिस अधीक्षकांच्या दालनात उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, एलसीबीचे पोलिस निरीक्षक यांच्या चौकशी समितीने याबाबत चौकशी केली. यात पोटे यांच्या मोबाइलच्या डीसीआरमधील संवादाबाबत चौकशी करण्यात आली.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.