माजलगाव येथील परभणी रोडवर महादेव गायकवाड यांचे गावरान धाबा नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर रोहित शिवाजीराव थावरे आणि त्याचे इतर दोन मित्र असलेले आरोपी ऋषिकेश रमेशराव थावरे आणि कृष्णा माणिकराव थावरे यांचा हॉटेलचे बिल देण्यावरून महादेव गायकवाड यांच्यासोबत वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर बाजूलाच असलेली लाकडी ढिल्पी उचलून महादेव गायकवाड यांच्या डोक्यात घालण्यात आली. तर महादेव गायकवाड यांचा मुलगा आशुतोष गायकवाड हा देखील या मारहाणीत जखमी झाला.बीडच्या माजलगाव येथील महादेव गायकवाड यांचा बिलाच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. शिवाय त्यांच्या धाब्याची तोडफोडही करण्यात आली होती. यातील प्रमुख आरोपी असलेले रोहित शिवाजीराव थावरे, ऋषिकेश रमेशराव थावरे, कृष्णा माणिकराव थावरे (सर्व रा. आनंदगाव) यांना आज पहाटे आळंदी (पुणे) येथून ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली.
माजलगाव येथील परभणी रोडवर महादेव गायकवाड यांचे गावरान धाबा नावाचे आहे. या Hotelवर रोहित शिवाजीराव थावरे आणि त्याचे इतर दोन मित्र असलेले आरोपी ऋषिकेश रमेशराव थावरे आणि कृष्णा माणिकराव थावरे यांचा हॉटेलचे बिल देण्यावरून महादेव गायकवाड यांच्यासोबत वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर बाजूलाच असलेली लाकडी ढिल्पी उचलून महादेव गायकवाड यांच्या डोक्यात घालण्यात आली. तर महादेव गायकवाड यांचा मुलगा आशुतोष गायकवाड हा देखील या मारहाणीत जखमी झाला.दोघांनाही उपचारासाठी माजलगावच्या संजीवनी Hospital येथे दाखल करण्यात आले होते. पैकी महादेव गायकवाड यांचा सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी आशुतोष गायकवाड यांच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात रोहित शिवाजीराव थावरे व अन्य दोन अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता.








