चांगले गुण देण्याचे आमिष देवून दोन शिक्षकांनी केला विद्यार्थ्याच्या आईवर अत्याचार !

राज्यातील अनेक ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच बुलढाण्यातील‎ मलकापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याच्या आईवर दोन शिक्षकांनी वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे. मुलाला चांगले गुण देण्याचे आमिष दाखवत हे कृत्य करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार मलकापूरच्या एका शाळेतील सहाय्यक शिक्षक समाधान इंगळे आणि सहाय्यक शिक्षक अनिल थाटे यांनी 2024 ते 2025 दरम्यान अनेकदा 34 वर्षीय महिलेवर अत्याचार केले.

आम्हाला खूश ठेव तुझ्या मुलाचा पहिला नंबर आणू, त्याला चांगले मार्क देऊ, असे आमिष या शिक्षकांनी महिलेला दाखवले होते. असे केले नाही तर तुझ्यासह मुलाला जीवे ठार मारू अशी धमकी दिल्याचेही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.पीडित महिला ही मूळ मोताळा‎ तालुक्यातील असून, मुलांच्या शिक्षणासाठी ‎मलकापूर येथे वास्तव्यास आली होती. तिने‎ मलकापूर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या ‎तक्रारीनुसार, समाधान इंगळे (वय 45)‎आणि अनिल थाटे (वय 47) या दोन ‎शिक्षकांनी तिच्यावर सप्टेंबर 2024 पासून‎ एप्रिल 2025 दरम्यान वेळोवेळी अत्याचार केले.

इंगळे हा तिच्या मुलाचा वर्गशिक्षक ‎असून, शैक्षणिक प्रगतीचे आमिष दाखवून ‎दोघांनीही तिला शारीरिक संबंधासाठी भाग‎ पाडले.‎ नकार दिल्यास मुलाला आणि तिला जीवे‎ मारण्याची धमकी दिली जात होती.‎ सततच्या त्रासामुळे मानसिकदृष्ट्या‎ खचलेल्या महिलेला अखेर धैर्य करून‎ पोलिसांत धाव घ्यावी लागली. या प्रकरणी‎ पीडितेच्या तक्रार वरुन मलकापूर पोलिसांनी‎ आरोपी समाधान इंगळे, अनिल थाटे यांच्या‎विरोधात गुन्हा दाखल करत आरोपींना‎ अटक केली आहे.‎ यानंतर त्यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.