पोत मंत्रवून देतो म्हणत वृद्ध महिलेची सोन्याची पोत लांबविली !

पोत मंत्रवून देतो असे म्हणत दोघांनी मुलाकडे जात असलेल्या कस्तुरबाई लक्ष्मण पाटील (वय ६०, रा. जामनेगाव, ता. पाचोरा) या वृद्ध महिलेला रस्त्यात थांबवले. त्यानंतर दोघांनी वृद्धेला गळ्यातील पोत काढण्यास सांगत हातचालाखी करीत एक तोळे सोन्याचे पोत चोरुन नेली. ही घटना दि. १५ रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास भजेगल्लीत घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा तालुक्यातील वरखेडीगावाजव असलेल्या जामनेगावात कस्तुरबाई लक्ष्मण पाटील या वृद्ध महिला वास्तव्यास आहे. दि. १५ रोजी सकाळी ८ वाजता बसने जळगावात राहणाऱ्या त्यांच्या मुलाकडे येण्यासाठी निघाल्या. नवीन बस स्थानकावर उतरल्यानंतर कस्तुरबाई या जूना खेडीरोडवरील दशरथ नगरात राहणारा त्यांचा मुलगा दशरथ पाटील याच्या भेटीकरीता जाण्यासाठी निघाल्या. भजेगल्लीतून मुलाकडे पायी जात असलेल्या वृद्ध महिलेला दोन अनोळखी इसमांनी थांबवले. यातील एक शरिराने जाड होता आणि त्याने डोक्यावर पांढरा रुमाल बांधलेला होता. तर दुसरा हा अंदाजे २० ते २५ वर्षाचा होता. त्यांनी वृद्ध महिलेच्या मागे जावून काही अंतरावर मावशी थांबा असे म्हणत थांबवले आणि त्यांनी एका मंदिराचा पत्ता विचारला. परंतू वृद्ध महिलेने રતૂટ્ટ त्यांना मला माहिती नाही असे सांगितले.

पत्ता विचारणाऱ्यांनी कस्तुरबाई पाटील यांना म्हणाला की, तु आजारी होतीस तुझ्या कडून पैसे घेत नाही, तुला पोत मंत्रवून देतो, ती देवाऱ्यात ठेवायची असे म्हणत त्याने वृद्धेला गळ्यातील पोत काढायला लावली. वृद्धेने देखील गळ्यातील एक तोळ्याची पोत काढून त्या अनोळखी इसमाच्या हातात दिली. वृद्ध महिला ही मुलाच्या घरी न जाता भजेगल्लीतून थेट त्यांची राधाबाई बाजीराव पाटील रा. विठ्ठलपेठ, जनेगाव राजाराम मंगलकार्यालयाच्या समोर येथे गेल्या. त्यांनी कागदपत्राची कुटुंबियांना हकीकत सांगितल्यानंतर कस्तुरबाई पाटील यांना अनोळखी इसमांनी बोलण्यात गुंतवणून हातचालाखी करीत त्यांची पोत लांबवल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार दोघ अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.