कर्जाचा विळखा त्यात नैराश्यानं ग्रासलं, ३२ वर्षीय शेतकरी तरुणानं जीवन संपवलं, कुटुंबावर संकट, आता आईचे काय.

मुर्तीजापूर तालुक्यातील शेरवाडी गावातील ३२ वर्षीय युवा शेतकरी विवेक बाबाराव ढाकरे यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. गेल्या महिन्यात जिल्ह्यात सहा तर फक्त मुर्तीजापूर मतदारसंघातच चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.अकोला जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. मुर्तीजापूर तालुक्यातील शेरवाडी गावातील ३२ वर्षीय युवा शेतकरी विवेक बाबाराव ढाकरे यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. गेल्या महिन्यात जिल्ह्यात सहा तर फक्त मुर्तीजापूर मतदारसंघातच चारशेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.विवेक ढाकरे हे वडिलोपार्जित ११ एकर शेती कसत होते. त्यांच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले होते, त्यामुळे संपूर्ण शेती व घराची जबाबदारी त्यांच्यावरच होती.

आईसोबत राहत असलेल्या विवेक यांना शेतीच्या खर्चासाठी घेतलेल्या कर्जाचा मोठा भार होता. सततच्या नापिकी, वाढती महागाई, आणि पिकाला योग्य भाव न मिळाल्यामुळे आर्थिक तंगीने त्रस्त असलेल्या विवेक यांनी शेवटी टोकाचे पाऊल उचलले.२६ मार्च रोजी नैराश्यातून त्यांनी घरातच कीटकनाशक प्राशन केले. कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी तातडीने त्यांना लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी अकोला शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच २ एप्रिल रोजी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.विवेक यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यांच्या तीन बहिणींचे लग्न झाले असून, कुटुंबात कमावणारा दुसरा कोणीच नाही. एका कर्त्या युवकाच्या आत्महत्येमुळे गावावर शोककळा पसरली असून, शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.अकोला जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनला आहे. कर्जमाफी, शेतीला हमीभाव, व पीकविमा यांसारख्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने घेऊन ठोस निर्णय घेतले नाहीत तर, असे दुर्दैवी प्रसंग वारंवार घडत राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता प्रशासन काय पाऊल उचलणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.