डाॅक्टर्स ग्रुपने घडविले माणुसकीचे दर्शन, सरपंच डॉ. दत्ता मोरे यांची दिवाळी – माणुसकीसोबत!

डाॅक्टर्स ग्रुपने घडविले माणुसकीचे दर्शन सरपंच डॉ. दत्ता मोरे यांची दिवाळी – माणुसकीसोबत!

विशेष प्रतिनिधी : शिवानंद पांचाळ नायगांवकर नायगांव, गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर,वयोवृद्ध, अनाथ आणि वंचित घटकांपर्यंत पोहचून त्यांना मदतीचा हात देण्याचे दायित्व अनेक वर्षांपासून पार पाडणाऱ्या डॉ. दत्ता मोरे यांच्या पुढाकारातून “डाॅक्टर्स ग्रुप” तर्फे या वर्षीही दिवाळी सण अर्थपूर्णरीत्या साजरी करण्यात आली. देगाव ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ. दत्ता मोरे यांच्या पुढाकाराने आणि डाॅ. यशवंत चव्हाण,बंजारा समाजाचे कार्यकर्ते रामराम चव्हाण, मंडळ अधिकारी रेड्डी, वैद्यकीय अधिकारी, शिक्षण स्वयंसेवक, पोलिस पाटील आदींच्या सहकार्याने दिवाळी शिधा कीट चे वाटप करण्यात आले.

डॉ. दत्ता मोरे यांनी गरीब व गरजूंची दिवाळी आनंदात साजरी व्हावी म्हणून तांदूळ, साखर, डाळ, तेल, मिठाई, फराळ आणि इतर आवश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करून या दिवाळीत “माणुसकीचा प्रकाश” पेटविला. कपडे असोत, किराणा असो, अनाथ मुलांचे शिक्षण असो किंवा वयोवृद्धांना मदत असो किंवा महाआरोग्य शिबीर असो – डॉ. मोरे यांचा सेवाभाव अखंड सुरू आहे.

या उपक्रमात डाॅक्टर्स ग्रुपचा दिपोत्सव समाजोपयोगी कार्याच्या माध्यमातून साजरा झाला. तसेच देगाव येथे शासकीय योजनेअंतर्गत १११ ज्येष्ठ नागरिकांना कृत्रिम अवयव व सहाय्य साधन कीट वाटप करण्यात आले.व वृद्ध नागरिकांच्या त्रासात आरोग्याची व सुखाची फुंकर घालण्याचं काम करण्यात आलं. या कार्यक्रमाला शेतकरी शेतमजूर पंचायत चे राज्य अध्यक्ष बळवंत मोरे, ग्रामविकास अधिकारी मोहनराव आडकीने, माजी सरपंच उत्तम मोरे, साईनाथ घोडके, राहुल गायकवाड, शुभम भद्रे, ज्ञानेश्वर कऱ्हाळे,रामराव चव्हाण, सलमान शेख, समीर पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.

या समाजोपयोगी आणि आगळ्या-वेगळ्या उपक्रमाने तालुक्यात सर्वत्र कौतुकाची लाट पसरली आहे. डॉ. दत्ता मोरे म्हणाले मी “निराधार, वयोवृद्ध आणि गरजवंता मध्येच देव आहे, म्हणूनच सामान्य माणसाला आधार देण्यासाठी हा छोटासा प्रयत्न करत असतो.”

  • Related Posts

    कॉ.गंगाधर गायकवाड कामगार चळवळीतील बहुजन रत्न पुरस्काराने सन्मानित..

    कॉ.गंगाधर गायकवाड कामगार चळवळीतील बहुजन रत्न पुरस्काराने सन्मानित.. विषेश प्रतिनिधी- शिवानंद पांचाळ नायगांवकर नांदेड : मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी चवळीतील लढाऊ कार्यकर्ते कॉ.गंगाधर गायकवाड यांना नुकतेच कामगार चळवळीतील बहुजन रत्न पुरस्काराने…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.