गावकऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रेम पाहून जीव झाला कासावीस, उत्तम गायकवाड..

गावकऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रेम पाहून जीव झाला कासावीस… उत्तम गायकवाड.

आचोंलीकराच्या निरोप समारंभाला गायकवाड यांच्या डोळ्यात अश्रूचा महापुर

विषेश प्रतिनिधी शिवानंद पांचाळ नायगांवकर नायगांव बाजार जि.नांदेड २९ ऑक्टोंबर ) स्वामी विवेकानंद एका प्रवचनात म्हणाले होते या जगात पाप नाही पुण्यही नाही तर अज्ञानपणा आहे तो अज्ञान पणा केवळ शिक्षकांमुळेच दूर होते हेच वाक्य तांतोतंत येथे जुळतो आहे. नायगाव तालुक्यातील मौजे अंचोली येथे गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेले मुख्याध्यापक उत्तम गायकवाड हे गावकऱ्यांना विश्वासात घेऊन शालेय समितीच्या सहकार्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवली,व डिजिटल शाळा देखील नायगाव तालुक्यात प्रथम क्रमांकाची आणून तीन लाख रुपयाचे बक्षीस मिळविले.


मुख्याध्यापक उत्तम गायकवाड आणि शिक्षिका सौ स्वाती अडबलवार यांचा निरोप समारंभ कार्यक्रम नामदेव पाटील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला प्रस्ताविक ज्येष्ठ नागरिक भगवानराव आंचोलीकर यांनी मांडले.आचोंलीकरांच्या निरोप समारंभाला उत्तर देताना मुख्याध्यापक उत्तम गायकवाड यांच्या डोळ्यात अश्रूचा महापुर वाहू लागला. ते म्हणाले की, शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांचे खूप सहकार्य लाभले.

त्यांच्यामुळेच हि शाळा मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात तालुक्यात सर्वप्रथम आणण्याचा मान मिळाला. तीन लाखाचे बक्षीस मिळाल्यामुळे शालेय भौतिक सुविधा करण्यास खूप मदत झाली. आधी शाळेला आणि नंतर मलाही या गावामुळे जिल्हा परिषदेचा जिल्हास्तरीय गुरु गौरव पुरस्कार मिळाला. शाळा जिल्हास्तरावर आणण्याचा माझा प्रयत्न होता. पण गावकऱ्याचे प्रेम आणि विद्यार्थ्यांचे प्रेम पाहून शाळेत जीव घुटमळत आहे. हा जीवनातला अविस्मरणीय क्षण मी कधीच विसरणार नाही. असे विचार व्यक्त करताना त्यांना आपले अश्रू आवरता आले नाही.

शिक्षण विस्तार अधिकारी उद्धव ढगे म्हणाले, गावकऱ्यांच्या सहकार्याने उत्तम गायकवाड, स्वाती अडबलवार,यांनी विविध शालेय उपक्रमात शाळा सहभागी करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला.शाळेच्या विकासासाठी मुख्याध्यापक उत्तम गायकवाड यांचे अतुलनीय योगदान आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळेच आज विद्यार्थ्यासह सर्व गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहे. आमच्या केंद्रातली नव्हे तर जिल्ह्यातील एक आदर्श शाळा म्हणून नावा रुपाला येण्यासाठी शिक्षकांचे ,गावकऱ्यांचे प्रयत्न अतिशय मोलाचे ठरले आहेत.
यावेळी एन डी वाघमारे केंद्र प्रमुख मंगेश हनवटे त्र्यंबक स्वामी, माजी सरपंच अश्विनी ताई मोरे, अशोक पाटील मोरे,माजी शालेय समिती अध्यक्ष दत्ता पाटील मोरे, विद्यमान शालेय समिती अध्यक्ष संजय पाटील मोरे संजय पाटील मोरे यासह अनेकांची उपस्थिती होती तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवराव मोरे यांनी केले आहे.

  • Related Posts

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान. धरणगाव तालुका प्रतिनिधि -‌ राजु बाविस्कर, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद तर्फे तात्यासाहेब ज्योतिबा फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025-…

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू.. प्रतिनिधी | जामठी राज्यातील ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना घरकुल मिळवून देणाऱ्या विविध आवास योजनांची तांत्रिक अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांनी प्रलंबित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..