धर्मशाळा व्यवस्थापकावर बनावट पासप्रकरणी गुन्हा..

धर्मशाळा व्यवस्थापकावर बनावट पासप्रकरणी गुन्हा.

आळंदी, प्रतिनिधी योगेश व्हिरोळकर संत श्री ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कार्तिकी वारीत मंदिर प्रवेश पास विशेष निमंत्रित लोकांना तसेच मानकरी दिंडी करी यांना दिले जातात. मात्र, एका पट्ट्याने द्वादशीसाठी मंदिर प्रवेशाचे सकाळी नऊ ते बाराचे पास बनावट तयार केले आणि लोकांना वितरित केले. पासधारक आणि बनावट पास बनवणाऱ्या आळंदीतील गोपाळपुरा येथील डांगे पंच धर्मशाळा व्यवस्थापक याला आळंदी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

शिवाजी विश्वनाथ पाटील (रा. राधाकृष्ण मंदिर जवळ केळगाव) असे बनावट प्रवेश पास बनविणाऱ्याचे नाव असून, त्यावर आज आळंदी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी (ता.१६) आज सकाळी आळंदी देवस्थानात घडली. याबाबत फिर्याद आळंदी देवस्थानचे सुपरवायझर तुकाराम माने यांनी आळंदी पोलिस ठाण्यामध्ये दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माउलींच्या संजीवन समाधी दिनानिमित्त विशेष अतिथी दिंडीप्रमुख वारकरी फडकरी तसेच प्रशासनातील महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींकरता विशेष मंदिर प्रवेश पत्रिका मंदिर संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांच्या सहीने छापील पास देण्यात येतो. कार्तिक वद्य अमावस्येपर्यंतच्या कालावधीत अतिथींना ज्या त्या उत्सवाच्यावेळेप्रमाणे देण्यात आलेली आहे.

त्यावर सिरीयल नंबर ही असतो. दरम्यान, आज साधारण साडेदहा वाजण्याच्या सुमारास विशेष मंदिर प्रवेश पत्रिका घेऊन चार वारकरी आळंदीतील मंदिरात आले आणि आम्हास दर्शनाकरता सोडण्याकरता एक कर्मचारी ह्या आमच्याकडे विशेष पास आहे. यावर फिर्यादी माने यांनी पास पाहिले असता ते मंदिर संस्थान कडून दिलेल्या मंदिर प्रवेश पत्रिका प्रमाणे उभे आहोत. मात्र त्यावर वेळ
आजची आणि नऊ ते बारा, अशी दिली होती तसेच त्या पासवर ६३८ असा सिरीयल नंबर होता. मात्र, आज मंदिर संस्थांकडून कोणत्याही कार्यक्रम नसल्याने पास दिले गेले नव्हते हे माने यांना माहिती होते
यामुळे त्यांनी मंदिर संस्थांचे प्रमुख आणि व्यवस्थापक यांना याबाबत प्रकार सांगितला आणि त्यांनी पास घेऊन आलेल्या चारही वारकऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, हे पास डांगे पंच धर्मशाळा आळंदी व्यवस्थापक शिवाजी विश्वनाथ पाटील यांनी दिले आहे. तसेच शिवाजी पाटील हा चार वारकऱ्यांना पाच दाखवून जिथे सोडले जाते. देवस्थानच्या प्रवेश पत्रिकेप्रमाणे हुबेहूब खोटे छापील पास बनवून त्यावर वारकऱ्यांची नावे टाकून उपयोग केला म्हणून आळंदी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.

  • Related Posts

    कॉ.गंगाधर गायकवाड कामगार चळवळीतील बहुजन रत्न पुरस्काराने सन्मानित..

    कॉ.गंगाधर गायकवाड कामगार चळवळीतील बहुजन रत्न पुरस्काराने सन्मानित.. विषेश प्रतिनिधी- शिवानंद पांचाळ नायगांवकर नांदेड : मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी चवळीतील लढाऊ कार्यकर्ते कॉ.गंगाधर गायकवाड यांना नुकतेच कामगार चळवळीतील बहुजन रत्न पुरस्काराने…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.