जळगाव शहरातील चोर बनले नगरसेवक आणि महापौर…

जळगाव शहरातील चोर बनले नगरसेवक आणि महापौर!

 

“मी ठेका घेणार नाही. “असे शपथपत्र सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. लोकांना खूप आवडले. आपण पण जळगाव मधील उमेदवार कडून असे लिहून घेतले तर चांगले होईल. तशी अपेक्षा करणे चांगले तर आहेच. पण हा नगरसेवक ठेकेदार आहे, असे माहीत असूनही जळगाव चे मतदार ठेकेदारांनाच निवडून देत आहेत. तर शपथपत्राचा उपयोग काय?  हा नगरसेवक रस्ता, गटार, मुतारी, संडास कामाचा, बाजार फी वसुलीचा, रेतीचा ठेका घेतो. त्यातून पैसा चोरतो. म्हणून त्यांचे बांधकाम निकृष्ट बनवतो. रस्ता उखडतो. मतदार खड्ड्यात पडून मरतो किंवा हात पाय मोडून घेतो. तरीही तो मतदार,त्याची बायको,त्याचे आईबाप, भाऊ बहिण, साले मेव्हणे पाव्हणे त्याच ठेकेदाराला मतदान करतात. का? तर म्हणे त्याने प्रत्येक मतांबद्दल एक हजार रूपये घरपोहच दिले होते. तर मग मत द्यावेच लागेल. शिवराम पाटील त्याच खड्ड्यात उभे राहून बोलतात. तो ठेकेदार तो रस्ता दुरुस्त करतो. हे खरे! पण शिवराम पाटील मताचे पैसे देत नाहीत. येथेच कमी पडतात.

जो माणूस ठेका घेत नाही, बाजारात वसुली करीत नाही, रेतीची चोरी करीत नाही, दारूचे दुकान चालवत नाही, तो कोठून पैसा देणार? पैसा वाटण्यासाठी आधी चोरी करावी लागते. जो चोरी करतो तो पैसा वाटतो. जो चोरी किंवा ठेकेदारी किंवा वसुली करीत नाही तो देऊ शकत नाही. यापैकी कोण योग्य आणि कोण अयोग्य? हे पोळी भाजी खाणाऱ्या बाईने माणसाने ठरवले पाहिजे. पण माणसाचे अन्न खाऊन ही कुत्र्यासारखे लाळ गाळत असतील तर ती माणसे मतदान करण्यास पात्र नाहीत. मतदारांचे खड्ड्यात पडून हात पाय मोडले किंवा मेले तर ते त्यांचे फळ त्यांना मिळाले. मी जळगाव शहरातील प्रत्येक प्रभागातील रस्ता, पाणी,वीज,गटार, सफाई बाबत आवाज उठवला. कामे झालीत. पण मतदारांना रोख पैसा दिला नाही. म्हणून लोकांनी मला अगदी समोर सभ्य भाषेत सांगितले.काका! तुम्ही काम चांगले करता पण आम्हाला रोख पैसा पाहिजे. तुम्ही द्या पैसा आम्ही करतो मतदान. लाठी शाळेजवळ मी मतदानाच्या दिवशी भेट दिली. एका तरूणाने मला चहा पाजून सभ्य आणि प्रेमळ भाषेत सांगितले .काका!  तुम्ही आमचे चांगले काम केले. तुमच्यामुळे आमचा रस्ता चांगला बनवला. आम्ही तुमचे आभार मानतो. सन्मान करतो. पण मत नाही देणार. कारण तुम्ही आमच्या जातीचे नाहीत. नाहीत तर नाहीत पण पैसे पण देत नाहीत. आम्हाला, आमच्या आई बापाला सवय लागली आहे कि, जो पैसा देईल त्यालाच मतदान करु. ही आमची संस्कृती आहे.

 

रायसोनी नगर मधे दोन कोटीचा ठेका देऊन कामे न करता पैसा हजम करणार होते.तेथील लोकांनी मला माहिती दिली.मी तेथे रस्त्यावर उतरलो.बोललो.तर कामे करावी लागली. तेथील नागरिकांनी माझा सत्कार केला.पण मतदान नाही केले.कारण सांगितले, आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत.तर आमचे मत त्यांनाच देणार.जरी ते चोर असले तरीही.चोर आमचा असला तरीही आम्हाला तोच प्रिय असतो.याला पक्षनिष्ठा म्हणतात.आम्ही चोरांशी सुद्धा निष्ठा बाळगतो.हाच आमचा धर्म. जळगाव शहरातील कोण नगरसेवक,कोण उपमहापौर,कोण महापौर ठेका घेतो,रेतीची चोरी करतो,बाजार फी वसुली करतो,मुडदे पाडतो हे मतदारांना चांगले माहीत आहे.तरीही ते अशाच माणसाला मतदान करीत असतील तर त्यांचे भाग्य तेच घडवत आहेत. प्रभात चौकात एक दारूचे दुकान होते.तर दारूडे बेवडे दारू पिऊन तेथेच नागडे उघडे पडून राहात असत.तेथील महिलांनी,पुरूषांनी दारूबंदी अधिक्षक कडे तक्रार केली.तर आढळले कि याच महिलांनी दारू दुकान सुरू करण्यासाठी ना हरकत पत्रावर सह्या केल्या आहेत.याच महिलांनी कबूल केले कि नरेंद्र मोदी कडे पाहून आम्ही दारू दुकानदाराला मतदान केले आहे.

म्हणून मी म्हटले,हे तुमच्या पापाचे फळ आहे.तर तुम्ही भोगलेच पाहिजे. जळगाव शहरातील मतदार आपल्याच पापाची फळे भोगत आहेत.ठेकादरांना, गुन्हेगारांना, चोरांना मत विकत आहेत.त्याचा हा परिणाम आहे. मी स्वतः रोटरी क्लब, लायन्स क्लब,शिक्षक संघटना, डॉक्टर असोसिएशन, वकिल संघटना, सांस्कृतिक मंडळे यांना वारंवार विनंती करतो कि तुम्ही तरी विचार करावा.चांगले कोण आणि चोर कोण? पण अजूनही प्रतिसाद मिळत नाही.ते अजूनही धार्मिक जोखंडामधे गुंतलेले आहेत.या शिक्षित, उच्चशिक्षित लोकांना अजूनही आकलन होत नाही कि, राजकारण,शासन, प्रशासन हे नागरी सोयी सुविधा साठी असते.धार्मिक काम करण्यासाठी काशी मथुरा पंढरपूर नाशिक येथील तिर्थक्षेत्रे आहेत.धर्माचा विचार,रक्षण,संवर्धन नागा साधू करीत आहेत.त्यांच्या चंगळ मंगळ साठी देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दाम गिरीश महाजन यांची नेमणूक करून २५ हजार कोटी बहाल केले आहेत.धर्म रक्षणाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस आणि संस्कृती रक्षणाची जबाबदारी गिरीश महाजन यांची आहे.ते करण्यासाठी तेच पात्र असावेत.तुम्ही नाहीत.त्यांनी नाशीक ला स्पॉ सेंटर,काल सेंटर,हैनी ट्रैप, कुंटणखाना टाकला तरीही ते धार्मिक काम आहे.हिच खरी आपली संस्कृती आहे.म्हणून विकसित करीत आहेत.मुद्दाम गिरीश महाजन यांच्या सौजन्याने आणि महत्प्रयासाने.

  • Related Posts

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान. धरणगाव तालुका प्रतिनिधि -‌ राजु बाविस्कर, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद तर्फे तात्यासाहेब ज्योतिबा फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025-…

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू.. प्रतिनिधी | जामठी राज्यातील ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना घरकुल मिळवून देणाऱ्या विविध आवास योजनांची तांत्रिक अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांनी प्रलंबित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..