धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाच्या स्थापनेसाठी शिवसैनिकांची कार्यशाळा..

धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाच्या स्थापनेसाठी शिवसैनिकांची कार्यशाळा, जिल्हाभरातील कार्यकर्ते उपस्थित; कक्ष प्रमुख डॉ.राजश्री अहिरावांचे मार्गदर्शन..

नंदुरबार (प्रतिनिधी)- शिवसेचे मुख्य नेते,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामार्फत गावपातळीपर्यंत कक्ष सुरू करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांना प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन राज्य कक्षाच्या प्रमुख डॉ. राजश्री अहिराव यांच्या हस्ते सोमवारी संजय टाऊन हॉलमध्ये करण्यात आले.शिवसेना पक्षाचे मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतांना त्यांच्या संकल्पनेतून “शासन आपल्या दारी” हा उपक्रम राबवून केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविला होता.

त्याच धर्तीवर, शेवटच्या नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत राज्यभर गावपातळीपर्यंत कक्ष सुरू असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात देखील कक्ष सुरू करण्यात येणार असल्याने सोमवारी संजय टाऊन हॉलमध्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राज्य कक्षाचे सहाय्यक मयूर कदम यांनी माहिती दिली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश पराडके,जि.प माजी अध्यक्ष वकील पाटील, शेतकी संघाचे चेअरमन बी.के पाटील,बाजार समिती सभापती दीपक मराठे, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे,माजी सभापती विक्रमसिंह वाळवी,माजी सभापती कैलास पाटील, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ज्योती राजपूत यांच्यासह पालिकेचे माजी नगरसेवक व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पदाधिकाऱ्यांनी शिबिराचे आयोजन करावे यावेळी राज्य कक्षाच्या प्रमुख डॉ. राजश्री अहिरराव यांनी सांगितले, कक्ष चालवण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची गरज असून, त्यासाठी संगणक वापरायचे ज्ञान असणारे २ कार्यकर्त्यांची नावे देणे आवश्यक आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात प्रशिक्षण शिबिर आयोजित करायचे असल्याने संपर्क साधावा.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.