नांदेड-मुंबई व नांदेड-गोवा विमानसेवा १५ नोव्हेंबरपासून सुरू! खासदार अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश..

नांदेड-मुंबई व नांदेड-गोवा विमानसेवा १५ नोव्हेंबरपासून सुरू! खासदार अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश..

विषेश प्रतिनिधी : शिवानंद पांचाळ नायगांवकर नांदेड : खासदार अशोकराव चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर नांदेडकरांची प्रतीक्षा संपली आहे. नांदेड-मुंबई आणि नांदेड-गोवा विमानसेवा येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, या दोन्ही सेवांचे संचालन स्टार एअर कंपनी करणार आहे.

दोन्ही सेवा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असतील. मुंबई-नांदेड फ्लाइट : दुपारी ४.४५ वाजता मुंबईहून उड्डाण करून ५.५५ वाजता नांदेडला पोहोचेल. परतीचे उड्डाण ६.२५ वाजता नांदेडहून होऊन ७.३५ वाजता मुंबईत उतरेल. गोवा-नांदेड फ्लाइट : गोव्याच्या मोपा विमानतळावरून १२ वाजता उड्डाण करून १ वाजता नांदेडला येईल. परतीचे उड्डाण १.३० वाजता नांदेडहून होऊन २.४० वाजता गोव्यात पोहोचेल. नांदेड-मुंबई सेवेसाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्लॉट मंजूर झाला आहे. या नव्या उड्डाणांमुळे नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील प्रवाशांना मोठी सोय होणार आहे. नांदेडहून आता एकूण ७ शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध असून, खासदार अशोकराव चव्हाण यांनी सांगितले की पुढील उद्दिष्ट तिरूपती, शिर्डी आणि कोल्हापूरसाठी थेट उड्डाणे सुरू करण्याचे आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.