मुंबईत तब्बल 11 लाख दुबार मतदार; प्रारुप मतदारयादीतून धक्कादायक माहिती उघड..

दुबार मतदारांवरून शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली असताना मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदारयादीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई: दुबार मतदार ांवरुन राजकीय वातावरण तापले असताना मुंबईत ११ लाखांहून अधिक असे मतदार असल्याचे मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदारयादीतून स्पष्ट झाले आहे. त्यात सर्वाधिक दुबार मतदार पश्चिम उपनगरात असून, मुंबई महापालिका निवडणुकीत हा प्रश्न निकाली काढण्याचे मोठे आव्हान निवडणूक यंत्रणांपुढे आहे.

मुंबईत ११ लाख एक हजार ५०५ दुबार मतदार असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, यातील एक लाख मतदारांची नावे तीन ते चार ठिकाणी असल्याचेही आढळले आहे. पश्चिम उपनगरात चार लाख ९८ हजार ५९७ दुबार मतदार आहेत. पूर्व उपनगरात तीन लाख २९ हजार २१६ आणि शहरात दोन लाख ७३ हजार ६९२ दुबार मतदार आहेत.

मतदारयादीवर हरकती व सूचना नोंदवण्यासाठी २७ नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. त्याआधीच २० नोव्हेंबरला प्रारूप मतदारयादी महापालिकेने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार दुबार मतदारांची संख्या उघड झाली आहे. मुंबईत एक कोटी तीन लाख ४४ हजार ३१५ मतदार आहेत. त्यापैकी ५५ लाख १६ हजार ७०७ पुरुष आणि ४८ लाख २६ हजार ५०९ महिला मतदार आहेत. या एकूण मतदारांमध्ये ११ लाखांहून अधिक दुबार मतदार असल्याने त्यांना रोखण्याचे आव्हान राज्य निवडणूक आयोग आणि मुंबई महापालिकेसमोर आहे. दुबार मतदारांना रोखण्यास निवडणूक आयोगाला अपयश आले आणि असे मतदार मतदानासाठी आल्यास त्यांना फोडा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांना केले होते. आता दुबार मतदारांची संख्या उघड झाल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तीन वॉर्डांमध्ये प्रत्येकी ६० हजारांहून अधिक मतदार
मुंबईतील एकूण मतदारांमध्ये ६० हजार आणि त्यापेक्षा जास्त मतदार हे तीन वॉर्डांतील तीन प्रभागांत आहेत. आर मध्य वॉर्डमधील (बोरिवली) प्रभाग क्रमांक १५ मध्ये ६१ हजार ३६१ मतदार, के पश्चिम वॉर्डमधील (अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम आणि विलेपार्ले पश्चिम) प्रभाग क्रमांक ६६ मध्ये ६१ हजार ५१८ मतदार आणि एन वॉर्डमधील (घाटकोपर) प्रभाग १३१ मध्ये ६२ हजार १४ मतदार, एल वॉर्ड प्रभाग क्रमांक १६४ मध्ये ६० हजार ९४ मतदार आहेत. इतर सर्व प्रभागांत ६० हजारांखाली मतदार आहेत.

कुठे किती दुबार मतदार?
४,९८,५९७—–पश्चिम उपनगरे
३,२९,२१६—- पूर्व उपनगरे
२,७३,६९२—- शहर

उपाययोजना अशा…
-दुबार मतदारांना नाव वगळण्यासाठी एक संधी मिळणार.
-महापालिकेकडून ५ डिसेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार.
-प्रारूप मतदारयादीत दुबार मतदार चिन्हांकित.
-मतदानावेळी दुबार मतदार आल्यास दुसऱ्या ठिकाणी मतदान न करण्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेणार

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% राखीव जागी प्रवेश मिळवण्यासाठी सरकारने लावलेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..